esakal | मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल; पुण्यातून एकाला अटक!
sakal

बोलून बातमी शोधा

mantralay

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल; पुण्यातून एकाला अटक!

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा एक ई-मेल गृहविभागात आल्याने सोमवारी मोठी खळबळ उडाली. या ई-मेलनंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) मंत्रालयात दाखल झालं असून येथे कसून तपासणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी एका व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. पंधरादिवसांपूर्वी मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन आला होता. मात्र नंतर ती केवळ अफवाच ठरली होती. (Email to plant bomb in Mumbai Mantralay One arrested from Pune)

हेही वाचा: सरनाईकांच्या 'लेटरबॉम्ब'नंतर महाविकास आघाडीची मंगळवारी बैठक

सुत्रांच्या माहितीनुसार, मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल पुण्यातून आला आहे. याप्रकरणी पुण्यातील मुंढवा पोलिसांनी शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. मुलाला शाळेत अॅडमिशन मिळाले नाही म्हणून त्याने गृहविभागाला हा ई-मेल केल्याचं सांगण्यात येत आहे. शैलेश हा पुण्यातील घोरपडी भागात राहतो.

हेही वाचा: EDची मोठी कारवाई; अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त

याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.

loading image