Afghanistan
esakal
अफगाणिस्तानचे वाणिज्य व उद्योग मंत्री अलहाज नूरुद्दीन अझीजी यांनी शुक्रवारी भारतीय उद्योगपतींना अफगाणिस्तानमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये अनुकूल वातावरण असल्याचं ते म्हणाले. अझीजी पाच दिवसीय भारत दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नवी दिल्लीत आयोजित संवाद सत्रात बोलताना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली.