esakal | अफगाणिस्तान: अमरुल्ला सालेह यांच्या भावाची हत्या?
sakal

बोलून बातमी शोधा

अफगाणिस्तान: अमरुल्ला सालेह यांच्या भावाची हत्या?

अफगाणिस्तान: अमरुल्ला सालेह यांच्या भावाची हत्या?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

काबूल : अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष आणि तालिबानचे विरोधक अमरुल्ला सालेह यांचा भाऊ रोहुल्ला सालेह यांची तालिबानने निर्दयी हत्या केली आहे. तालिबानने अनन्वित छळ करून रोहुल्लाहची हत्या केल्याचे उघड झाले आहे. परंतु या घटनेला अद्याप दोन्हीकडून दूजोरा मिळालेला नाही.

हेही वाचा: पुण्यातील 900 हून अधिक रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा

पंजशीरहून काबूलकडे रवाना होण्यापूर्वी तालिबानने रोहुल्लाची हत्या केल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. सालेह हे ज्या घरातून व्हिडिओ व्हायरल करत होते, त्या घरात तालिबान पोचल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. तालिबानने सालेह यांच्या घराचा ताबा मिळवला आहे. परंतु या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. तालिबानकडून देखील यासंदर्भातील निवेदन जारी करण्यात आलेले नाही. तसेच सालेह यांच्याकडूनही कोणतिही प्रतिक्रिया आलेली नाही. अमरुल्ला सालेह यांच्या भावाचा खूप छळ केला आणि नंतर त्याची हत्या केल्याचे काही माध्यमांनी म्हटले आहे.

हेही वाचा: Video : लालबागच्या राजाच्या दरबारात पोलीस अधिकाऱ्याची 'गुंडगिरी'

अमरुल्ला सालेह यांच्याबाबत माध्यमांनी म्हटले की, त्यांनी अफगाणिस्तान सोडले असून ते ताझिकिस्तानला गेले आहेत. परंतु सालेह यांनी अलीकडेच एक व्हिडिओ जारी करत आपण पंजशीरमध्येच असल्याचा दावा केला.

loading image
go to top