esakal | Video : लालबागच्या राजाच्या दरबारात पोलीस अधिकाऱ्याची 'गुंडगिरी'
sakal

बोलून बातमी शोधा

Lal Bagcha Raja

Video : लालबागच्या राजाच्या दरबारात पोलीस अधिकाऱ्याची 'गुंडगिरी'

sakal_logo
By
सुधीर काकडे

राज्यासह संपुर्ण देशात आज गणेशोत्सवाला सुरुवात झाली. कोरोना महारीची साथ असल्याने, सरकराकडून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन वारंवार केले जाते आहे. मुंबईसह राज्यातील प्रसिद्ध गणपती मंदीरांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. त्यातच आज मुंबईतील लाल बागचा राजा मंदीर परिसरातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. लाल बागचा राजा मंदीर परिसरात बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने एका मराठी वृत्त वाहिनीच्या पत्रकरासोबत अत्यंत निंदनीय वर्तन केल्याचे पाहायला मिळाले आहे.

राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सव साजरा केल्या जात असून, कोरोना नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाकडून उपाययोजना केल्या गेल्या आहेत. मात्र आज लाल बागचा राजा मंदीर परिसरातुन समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पोलीस अधिकाऱ्याने पत्रकाराला धक्के मारत बाहेर काढल्याचे दिसते आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा: फेसबुकद्वारे आर्थिक फसवणुकिच्या गुन्ह्यात वाढ

दरम्यान, मुंबईतील लाल बागचा राजा मंदीर परिसरात दरवर्षी मोठी गर्दी होत असते. गर्दी टाळण्यासाठी मंदीर प्रशासनाकडून पास देण्यात आले असुन, माध्यम प्रतिनीधींना देखील पास अनिवार्य करण्यात आले आहेत. मात्र या पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार पास असून देखील त्यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.

loading image
go to top