अफगानिस्तानात महिलांचे आंदोलन; तालिबान्यांकडून अश्रूधूरांचा मारा

स्वता:च्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या महिलांवर तालिबानात अश्रूवायूंचा मारा करण्यात आल्याचे वृत्त तेथील स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
Womens Protest
Womens ProtestPRINT-132

काबूल : तालिबानची सत्ता आल्यापासून अफगानिस्तान हा अस्थिर असल्याचा आपल्याला पहायला मिळाला आहे. कधी नागरिकांच्या कत्तली तर कधी बेसुमार हल्ले होत असतात. दरम्यान अफगानिस्तानात महागाईने कळस गाठला होता. स्वता:च्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या महिलांवर तालिबानात अश्रूवायूंचा मारा करण्यात आल्याचे वृत्त तेथील स्थानिक माध्यमांनी दिले आहे. (Afganistan Womens Protest)

आपल्या हक्कासाठी आणि आपल्या हक्काच्या उल्लंघनप्रकरणी या महिला रस्त्यावर उतरुन आंदोलत करत होत्या. त्यानंतर तालिबान्यांकडून त्यांच्यावर अश्रूधारांचा हल्ला करण्यात आलायं. ''आम्ही शांततेत आंदोलन करत असतानाही तालिबानने आमच्यावर हल्ला चढवला.'' असे आंदोलन करणाऱ्या एका महिलेने सांगितले आहे.

Womens Protest
मुंबई : सायकल ट्रॅक विरोधात न्यायालयात याचिका

तालिबान सरकारने महिलांच्या विरोधातील कायदा आणल्याने महिलांना पूर्ण वेष परिधान करण्याची सक्ती करण्यात आली आहे. अफगाण मंत्रालयाने तेथील महिलांना तोंडावर स्कार्फ नसताना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे. तसेच काबूलमधील नव्या नियमानुसार महिलांना पूर्ण पोशाख परिधान न करता माध्यमांसमोर आणि शैक्षणिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास बंदी घालण्यात आली आहे असं स्फुटनिक ने म्हटलं आहे.

जसजसं काबूलमध्ये तालिबानचं वर्चस्व वाढंत गेलंय तसतसं अफगाणिस्तानमध्ये महिलांनी वेगवेगळ्या शहरात आंदोलन करुन महिलांना सरकार आणि स्थानिक प्रशासनात स्थान देऊन त्यांचा आदर केला जावा अशी त्यांची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com