अफगाणिस्तानचे माजी अर्थमंत्री अमेरिकेत चालवतायेत उबर टॅक्सी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Khalid Payenda

अफगाणिस्तानचे माजी अर्थमंत्री अमेरिकेत चालवतायेत उबर टॅक्सी

काबुल तालिबानच्या हाती पडण्याच्या काही दिवस आधी अर्थमंत्री पदाचा राजीनामा देणारे खालिद पायेंदा (Khalid Payenda) सध्या जॉर्जटाउन विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. यासाठी त्यांना प्रति सेमिस्टर 2,000 डॉलर मिळतात. त्याशिवाय ते वॉशिंग्टन आणि आसपासच्या परिसरात उबेर कॅब (Uber Taxi) चालविण्याचेदेखील काम करत आहेत. दरम्यान, त्यांना मिळालेल्या संधीबद्दल आपण कृतज्ञ असून, यामुळे पत्नी आणि चार मुलांचा सांभाळ करण्यास मदत होत असल्याचे वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मंत्रिपदाच्या काळातील काही जुन्या आठवणींनादेखील उजाळा दिला. याबाबत हिंदुस्थान टाईम्सने वृत्त प्रकाशित केले आहे. ( Khalid Payenda Drives Uber In US )

हेही वाचा: एमआयएमचा कट उधळून लावा; उद्धव ठाकरेंच्या खासदारांना सूचना

अश्रफ घनी (Ashraf Ghani) यांनी एका सार्वजनिक सभेत लेबनीज कंपनीला पैसे देण्यास त्यांच्या मंत्रालयाच्या अपयशाबद्दल ताशेरे ओढल्यानंतर आपण या पदाचा राजीनामा दिल्याचे पायेंदाने यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितले. एवढेच नव्हे तर, त्यावेळी घनीचा राग पाहून आपल्याला खोट्या आरोपाखाली अटक केली जाईल अशी भीती वाटल्याचेही त्यांनी सांगितले. "सध्या, माझ्याकडे स्वतःची जागा नसल्याचे सांगत, मी इथलाही नाही आणि तिथलाही नाहीये ही भावना खूप वेदनादायी असल्याचे खालिद म्हणाले.

हेही वाचा: अलविदा शेन वॉर्न! फ्रेंड्स अँण्ड फॅमिलीनं दिला अखेरचा निरोप

खालिद पायेंदाने मायदेश सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. 1992 मध्ये, जेव्हा ते फक्त 11 वर्षांचे होते, तेव्हा अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्ध सुरू झाल्यामुळे त्यांचे कुटुंब पाकिस्तानात गेले होते. एका दशकानंतर, अमेरिकन लोकांनी तालिबानचा पाडाव केल्यानंतर, ते अफगाणिस्तानच्या पहिल्या खाजगी विद्यापीठात परत आल्याचे एका अहवालात म्हटले आहे. 2020 मध्ये, जेव्हा त्यांना अर्थमंत्री पदाची ऑफर देण्यात आली तेव्हा ते घनी यांच्यासाठी अल्पकालीन प्रकल्पावर काम करण्यासाठी काबूलला परतले.

Web Title: Afghanistans Last Finance Minister Khalid Payenda Now Drives Uber In Us

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top