
ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला धडा शिकवला. मात्र तरीही पाकिस्तानकडून कुरापती कमी होत नाहीयेत. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा भारताविरोधात बरळला आहे. रविवारी पाकिस्तानी लष्कराचं कौतुक करताना आफ्रिदीने म्हटलं की, भारताच्या आक्रमक भूमिकेवर पाकिस्तानने निर्णायक प्रतिक्रिया दिली. भारताने पाकिस्तानला कमी लेखण्याची चूक केली.