
सोशल मीडिया कंपनी ट्विटरने Twitter सोमवारी मोठी घोषणा केली आहे
नवी दिल्ली- सोशल मीडिया कंपनी ट्विटरने Twitter सोमवारी मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प समर्थक QAnon conspiracy शी जोडलेले 70 हजारपेक्षा अधिक ट्विटर हॅँडल्स निलंबित केले आहेत. मागील आठवड्यात ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीवर हल्ला करत हिंसा घडवून आणली होती. या पार्श्वभूमीवर ट्विटरने हे पाऊल उचललं आहे.
ट्विटरने कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये हिंसा झाल्यानंतर अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट अनिश्चितकाळासाठी बॅन केले आहे. ट्रम्प यांच्या अकाऊंटला चिथावणीखोर ट्विट आणि हिंसा पसरवण्याच्या भीतीने सस्पेंट करण्यात आलं आहे, असं मायक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्मने म्हटलं आहे.
सरकारला कोविशिल्ड 200 रुपयात तर प्रायव्हेटमध्ये कितीला? अदर पूनावालांनी दिली...
ट्विटरने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, शुक्रवारी आम्ही 70 हजारांपेक्षा अधिक अकाऊंटस सस्पेंड केले आहेत. यामध्ये असेही प्रकरणे होते की, एकच व्यक्ती अनेक अकाऊंट वापरत होता. हे अकाऊंट हिंसेसंबंधात ट्विट करत होते. त्यामुळे त्यांचे ट्विटवर अकाऊंट्स सस्पेंड करण्यात आले आहेत.
20 जानेवारीला अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ट्विटरसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खबरदारी घेताना दिसत आहेत. फेसबुक आणि इन्स्ट्राग्रामने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट निलंबित केले आहे. ट्रम्प यांना समर्थन देणाऱ्या उजव्या संघटनांविरोधातही सोशल मीडिया कंपन्या कठोर पाऊल उचलताना दिसत आहे.
स्वामी विवेकानंदाच्या प्रश्नांनी गोरक्षकाची बोलती झाली होती बंद!
अमेरिकेत गेल्या बुधवारी इलेक्टोरल मतांच्या मोजणीवेळी हिंसाचार झाला होता. यामुळे ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्यात. मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरने त्यांचे खाते सस्पेंड केले. ट्रम्प यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी सातत्यानं ट्विटरचा वापर केला. त्यांच्या चिथावणीखोर आणि खोट्या वक्तव्यांमुळे ट्विटरने त्यांचं खातं सस्पेंड केलं. हा निर्णय घेण्यात भारतीय वंशाची विजया गड्डे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
विजया यांनीच ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट कायमस्वरुपी सस्पेंड करण्यात आल्याचं सांगितलं होतं. ट्विटरने शुक्रवारी पहिल्यांदा ट्रम्प यांचे ट्विटर हँडल सस्पेंड केलं होतं. कंपनीचं म्हणणं आहे की, ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून अमेरिकेच्या संसदेत आंदोलकांना भडकावलं होतं.