सरकारला कोविशिल्ड 200 रुपयात तर प्रायव्हेटमध्ये कितीला? अदर पूनावालांनी दिली माहिती

टीम ई सकाळ
Tuesday, 12 January 2021

भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरु होणार आहे. भारत सरकारने मंगळवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून 1.1 कोटी डोस विकत घेतले आहेत.

पुणे - भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरु होणार आहे. भारत सरकारने मंगळवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून 1.1 कोटी डोस विकत घेतले आहेत. देशातील 13 शहरांमध्ये ही लस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी सरकारला 10 कोटी डोस 200 रुपयांमध्ये देणार असल्याचं सांगितलं आहे. 

सरकारला 200 रुपयांच्या विशेष किंमतीमध्ये 10 कोटी डोस देण्यात येणार आहेत. याबाबत सरकारकडून विनंती करण्यात आली होती. सर्वसामान्य, गरीबांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना आधार द्यायचा आहे. यानंतर आम्ही लशीची विक्री 1 हजार रुपयांमध्ये प्रायव्हेटमध्ये करणार असल्याचंही सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितलं.

हे वाचा - 13 शहरांमध्ये झाली लशीची डिलिव्हरी; कोणत्या राज्याला किती डोस मिळाले?

हे वाचा - 'सीरम' लसीचे तीन ट्रक पहाटे रवाना; पुण्यातून देशभरात होणार वितरण

अदर पूनावाला म्हणाले की, सध्या परवडेल अशा दरात लस पुरवली जाईल. याचा उत्पादन खर्च 200 रुपयांपेक्षा थोडासा जास्त आहे. त्यामुळे सध्यातरी कोणताही फायदा न पाहता देशासाठी आणि सरकारसाठी 10 कोटी डोस पुरवण्यात येणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special price of Rs 200 for the first 100 mn doses only to GoI says serum