पाकवर ट्रिपल संकटाचा मारा! अमेरिका-चीन यांच्यातील शीतयुद्धाचीही मोजावी लागेल किंमत

coronavirus crisis, coronavirus, US, America, China, Pakistan
coronavirus crisis, coronavirus, US, America, China, Pakistan

इस्लामाबाद : आर्थिक मंदी आणि कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानला अमेरिका आणि चीन यांच्यातील शीतयुद्धाचाही मोठा फटका सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कधीकाळी अमेरिकचा वरदहस्त असलेला पाक सध्याच्या घडीला चीनच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळते.  पाकिस्तानमधील स्टेट बँकेने यावर्षीचा आर्थिक विकास दर नकारात्मकतेच्या स्थितीत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आगामी काही वर्षात पाकिस्तानवर आर्थिक संकट घोंगावण्याचे संकेत मिळत आहेत.

दुसरीकडे कोरोना विषाणूच्या संकटजन्य परिस्थितीला चीनच कारणीभूत असल्याचा आरोप अमेरिका करत आहे. चीन-अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाची किंमत ही पाकिस्तानलाही मोजावी लागेल. चीन अमेरिकेत व्यापारात निर्माण झालेला दुरावा हा पाकच्या अडचणीत भर पाडतील. नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोनाजन्य संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक समुदायाकडे मदतीची याचना केली होती. पण त्यांना कोणीही कर्ज देण्याची तयारी दर्शवली नाही. सध्याच्या परिस्थितीत अमेरिका आणि चीन दोन्ही देश आपापल्या देशातील अंतर्गत परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या दोन्ही राष्ट्रांकडून पाकला मदत मिळणे कठीण दिसते.  

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने  आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे मदत मागितली होती. या संस्थेने पाकला मदत जरी केली असली तरी पाकने मागणी केलेल्या रक्कमेच्या निम्म्यापेक्षा कमी मदत त्यांना देण्यात आली. सध्याच्या घडीला पाकवर आंतरराष्ट्रीय कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.  2015 मध्ये चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर (China Pakistan Economic Corridor) प्रकल्प सुरु करण्यात आला होता. याच्यामाध्यमातून चीन पाकिस्तानमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश ठरला होता. 2016 मध्ये या प्रकल्पावरुन पाकमध्ये मोठे राजकारण झाले. सध्या हा प्रकल्प स्थगित आहे. सीपीईसी प्रकल्पामुळे पाकिस्तानचा फायदा कमी आणि दीर्घकालीन तोटा जास्त असल्याचे सांगत अमेरिकेने पाकला सावधानतेचा इशाराही दिला होता.

 पाकिस्तानने आतापर्यंत अमेरिका आणि चीन यांच्यासोबतच्या संबंधांचा चांगलाच फायदा उठवला आहे. चीनने 1980 आणि 1990 च्या दशकात अण्वस्त्र आणि बॅलिस्टिक मिसायल कार्यक्रमसाठी पाकला मदत केली होती. आजही पाक-चीन सुरक्षा क्षेत्रात एकत्र काम करत आहेत. मात्र आता दोन्ही देशांतील शुतयुद्धाच्या परिस्थितीत पाकची चांगलीच गोची होणार असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय राजकारणात रंगताना दिसत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com