China Gold Treasure: ८ वर्षांच्या खोदाईनंतर मिळाला सोन्याचा प्रचंड मोठा साठा!

या सोन्याची किंमत इतकी आहे की त्यावरील शून्य मोजताना थकून जाल
gold mine
gold mine

China Gold Treasure: चीनमध्ये सोन्याचा इतका मोठा साठा आढळून आला आहे की, याच्या किंमतीवरील शून्य मोजताना तु्म्ही थकून जालं. चीनच्या शेडोंग प्रांतातील रुशान नामक शहरात ही सोन्याची खाण सापडली आहे.

या खाणीत तब्बल ५० टन सोनं असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रांताच्या खनिज संसाधन प्राधिकरणानं ही माहिती दिली आहे. (after eight years of digging a huge amount of gold was found in China)

gold mine
Sanjay Raut News: "...पण माझी हरकत नाही"; हक्कभंगाच्या नोटिशीला संजय राऊतांचं उत्तर

सोन्याची किंमत इतकी की शून्य मोजताना थकाल

चीनमध्ये आढळलेल्या या सोन्याची सध्याची किंमत सुमारे ३ ट्रिलियन डॉलर म्हणजेच सुमारे २४७ लाख कोटी रुपये इतकी आहे. शेडोंग प्रोविंशिअल ऑफ जियोलॉजी अँड मिनरल रिसोर्सेसनं याची माहिती दिली आहे.

त्यांनी म्हटलं की, सोन्याचं हे भंडार मोठ्या भागावर पसरलं आहे. त्यामुळं या खाणीतून खनिजं बाहेर काढणं आणि त्यातून सोनं वेगळं करणं सोप असल्याचंही सांगितलं आहे. या सोन्याच्या अंदाजे मुल्यांकनानंतर हे समोर आलंय की, सोन्याचं हे भंडार कमीत कमी वीस वर्षांपर्यंत २ हजार टन सोन्याचं उत्पादनं करु शकतं.

gold mine
OROP: 'वन रँक, वन पेन्शन'वर आता 'सुप्रीम' तोडगा! थकबाकी देण्यासाठी कोर्टाची डेडलाईन

८ वर्षांच्या खोदकामानंतर हाती आलं सोनं

चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या अहवालानुसार, सुमारे 8 वर्षे चाललेल्या शोधानंतर चीनला इतकं मोठं भंडार हातील लागलं आहे. रिपोर्टनुसार, या खाणीत उच्च दर्जाचं सोन उपलब्ध आहे. ज्याचं सहजरित्या उत्खननं केलं जाऊ शकतं. यामुळं चीनच्या सोन्याच्या भंडारात मोठी वाढ झाली आहे.

हे ही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

चीनजवळ सध्या किती सोनं आहे?

ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चीनजवळ यंदा फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत १८६९ टन सोन्याचा साठा आहे. शेडोंग प्रांतांत सर्वात जास्त सोन्याचं उत्पादन होतं. या ठिकाणी सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. यामुळं चीनच्या एकूण सोन्याच्या साठ्यात मोठी वाढ होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com