रशियामध्येही चाकू हल्ल्याची घटना; 'अल्लाहू अकबर' ओरडत पोलिसाला भोसकले

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 30 October 2020

फ्रान्स आणि सौदी अरेबियानंतर (France Church Attack) आता रशियामध्येही चाकू हल्ल्याची घटना घडली आहे

मॉस्को- फ्रान्स आणि सौदी अरेबियानंतर (France Church Attack) आता रशियामध्येही चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका 16 वर्षीय तरुणाने 'अल्लाहू अकबर'चा नारा देत पोलिसावर चाकु हल्ला केला आहे. तरुणाने 3 वेळा पोलिसावर चाकूने वार केला. यानंतर एका सहकारी पोलिसाने तरुणाला गोळ्या घातल्या. यात तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. याआधी सौदी अरेबियामध्ये फ्रान्स दुतावासाच्या बाहेरील गार्डवर चाकू हल्ला झाल्याची बातमी समोर आली होती. गुरुवारी फ्रान्सच्या नीसमध्ये एका ट्यूनीशियाई हल्लाखोराने तीन लोकांचा जीव घेतला होता. रशियाच्या Interfax वृत्तवाहिनीने यासंबंधी माहिती दिली आहे. 
 

तरुणाने स्वत:जवळ चाकू आणि पेट्रोल बॉम्ब बाळगले होते. तरुणाने पोलिसाच्या पाठीमागून तीन घातक वार केले. ही घटना रशियाच्या कुक्मोर शहरात घडल्याचे सांगितले जात आहे. रशियाचा हा भाग मुस्लीम बहुल आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी फ्रान्स अध्यक्षांविरोधात आंदोलन झाले होते. रशियाने याला दहशतवादी हल्ला ठरवलं असून याप्रकरणात सामील असलेल्या लोकांचा शोध सुरु करण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, चाकू हल्ला करण्यापूर्वी तरुणाने जोरात 'अल्ला हू अकबर' ओरडले. तरुण पोलिस स्टेशनच्या बिल्डिंगला आग लावण्यासाठी आल्याचे सांगितले जाते. जखमी पोलिसाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी सौदी अरेबियामध्ये चाकू हल्ल्याची घटना समोर आली होती. फ्रान्स दुतावासाबाहेर उभ्या असलेल्या गार्डवर एका तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. फ्रान्सने या हल्ल्याचा निषेध केला आहे. 

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी दंगल उसळण्याची शक्यता; मार्क झुकरबर्गचा इशारा

फ्रान्समध्ये झाला होता चाकू हल्ला

फ्रान्समधील नीस शहरातील चर्चमध्ये गुरुवारी एका हल्लेखोराने चाकू हल्ला करत तिघांना ठार केले होते. या क्रूर घटनेमध्ये एका महिलेचा शिरच्छेद करण्यात आला होता. तसेच काही फ्रान्स नागरिक जखमी झाले होते. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर 21 वर्षिय ट्यूनीशियाई आहे. नीस शहराचे महापौर क्रिश्चियन एस्ट्रोसी यांनी दहशतवादी हल्ला असं या हल्ल्याचं वर्णन केलं आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या कार्टूनवरून सध्या फ्रान्समध्ये वाद सुरू आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after france in russia boy screaming allahu akbar knife attack on police officer