भारत अमेरिकेमध्ये येत्या सप्टेंबरमध्ये होणार "युद्ध अभ्यास'

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

आशिया-प्रशांत भागामध्ये चीनकडून राबविण्यात येत असलेल्या आक्रमक धोरणाच्या पार्श्‍वभूमीवर भारत, अमेरिका आणि जपानसहित आग्नेय आशियामधील इतर देशांची वाढती जवळिक अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे

नवी दिल्ली - भारत, अमेरिका व जपान या तीन देशांमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या व्यापक स्तरावरील एकत्रित नौदल सरावानंतर (मलबार 2017) येत्या सप्टेंबर महिन्यात भारत व अमेरिका "युद्ध अभ्यास' हा लष्करी सराव करणार असल्याचे वृत्त आहे.

भारत व अमेरिकेमधील व्यूहात्मक भागीदारी टप्प्याटप्प्याने अधिकाधिक विकसित करण्याचे दोन्ही देशांचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्‍वभूमीवर या नव्या लष्करी सरावाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया-प्रशांत भागामध्ये चीनकडून राबविण्यात येत असलेल्या आक्रमक धोरणाच्या पार्श्‍वभूमीवर भारत, अमेरिका आणि जपानसहित आग्नेय आशियामधील इतर देशांची वाढती जवळिक अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

भारत व अमेरिकेमधील युद्ध अभ्यास अमेरिकेमधील लेविस-मॅककॉर्ड लष्करी तळावर 14 ते 27 सप्टेंबर होणार आहे.

Web Title: After Malabar, India, US gear up for September military drill