अफगानिस्तानात अध्यक्षांनंतर मीच लोकप्रिय - रशीद खान

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

सामना संपल्यावर बस मध्ये पोहचो तेव्हा मित्रांनी मला सचिन तेंडूकरने केलेल्या ट्विटचे स्क्रीन शॉट पाठवले होते. हे पाहून मलाही धक्का बसला. याच्यावर काय उत्तर द्यायचे याचा 1 ते 2 तास विचार करत होते. मला काय लिहावे हे कळत नव्हते. पण शेवटी मी उत्तर दिले. संपुर्ण अफगानिस्ताने सचिनचे ट्विट पाहिले. सचिन तेंडूलकर अफगानिस्तामध्येही खुप लोकप्रिय आहे.

मुंबई : दोन दिवसांपुर्वी संपलेल्या इंडियन प्रिमिअर लिगमध्ये (आयपीएल) आपल्या चमकदार कामगीरीमुळे प्रसिद्ध झालेला अफगानिस्ताचा खेळाडून रशीद खान पुन्हा एका चर्चेचा विषय ठरला. अफगानिस्तामध्ये देशाच्या अध्यक्षांनंतर मीच सर्वात जास्त लोकप्रिय असल्याचे त्याने म्हटले आहे. सोमवारी मुंबई येथे झालेल्य आपीएल पुरस्कार प्रदान सोहळ्यात खान याला यावर्षीचा सर्वोत्तम टीट्वेंट्टी गोलंदाज पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

19 वर्षीय रशीद खान सनराईज हैद्राबाद संघाकडून खेळत होता. खेळातील सातत्य टिकवल्याने तो चांगली कामगीरी करणारा अष्टपैलू खेळाडू ठरला. कोलकत्ता नाईट रायडर्स सोबत इडन गार्डन येथे पात्रता फेरी सामन्यात त्याने चांगला खेळ केला होता. त्याच्या खेळावर खुश होऊन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने, "खान हा टीट्वेंट्टी मधील जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज असल्याचे ट्विट केले होते." 

यावर बोलताना खान म्हणाला, "सामना संपल्यावर बस मध्ये पोहचो तेव्हा मित्रांनी मला सचिन तेंडूकरने केलेल्या ट्विटचे स्क्रीन शॉट पाठवले होते. हे पाहून मलाही धक्का बसला. याच्यावर काय उत्तर द्यायचे याचा 1 ते 2 तास विचार करत होते. मला काय लिहावे हे कळत नव्हते. पण शेवटी मी उत्तर दिले. संपुर्ण अफगानिस्ताने सचिनचे ट्विट पाहिले. सचिन तेंडूलकर अफगानिस्तामध्येही खूप लोकप्रिय आहे. त्याच्या या शब्बासकीमुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. माझ्यासाठी तर हेच सर्वात मोठे बक्षिस आहे. विराठ कोहली, महेंद्रसिंह धोनी, ए.बी.डीव्हीरीअर्स हे जगातील सर्वोत्तम खेळाडू आहेत. त्यांना बाद करणे हे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहेत."

Web Title: after president I’m most popular in Afghanistan