Pakistan News : भारत-पाकिस्तान याच्यातील संघर्ष सध्या युद्धविरामामुळं स्थिर असला तरी अद्याप यासंबंधीच्या चर्चा सुरुच आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं सातत्यानं केलेल्या काऊंटर हल्ल्यांमध्ये १० मे रोजी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रानं पाकिस्तानातील नूर खान एअरबेस उडवला होता. पण त्यावेळी पाकिस्तान सातत्यानं या घटनेचा इन्कार करत होता. पण आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांना अखेर हे मान्य करावं लागलं आहे. पाकिस्तानच्या जीओ टीव्हीनं दिलेल्या एका वृत्तानुसार त्यांनी हे मान्य केलं आहे.