अमेरिकेनंतर आता न्यूझीलंडमध्ये भारतीयावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

ऑकलंड - गेल्या काही दिवसांत अमेरिकेमध्ये भारतीयांवर झालेल्या हल्ल्यानंतर आता अशाच प्रकारचा हल्ला न्यूझीलंडमध्ये एका भारतीयावर करण्यात आला.

ऑकलंड - गेल्या काही दिवसांत अमेरिकेमध्ये भारतीयांवर झालेल्या हल्ल्यानंतर आता अशाच प्रकारचा हल्ला न्यूझीलंडमध्ये एका भारतीयावर करण्यात आला.

न्यूझीलंडमधील नरेंद्र सिंह या भारतीय नागरिकावर हा हल्ला करण्यात आला. नरेंद्र सिंह आपल्या गाडीने जात असताना ही घटना घडली. ही घटना त्यांनी फेसबुकवर लाईव्ह केल्यामुळे समोर आली. या लाईव्ह व्हिडीओमध्ये हल्लेखोर त्यांना धमकावत असल्याचे व शिवीगाळ करत असल्याचे नरेंद्र सांगत आहेत. अमेरिकेतील हल्ल्यांप्रमाणेच या हल्ल्यातही तुमच्या देशात निघून जा अशी धमकी त्यांना देण्यात आली. यावेळी पंजाबी लोकांबाबत मुद्दाम अपशब्द वापरुन त्यांना डिवचण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

अमेरिकेत गेल्या काही दिवसांत तीन भारतीय नागरिकांची हत्या करण्यात आली होती. अशा प्रकारे वंशवादातुन होणाऱ्या हल्ल्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ होताना दिसत आहे.

Web Title: After USA now attack on Indian in NZ