
नवी दिल्ली : 21व्या शतकात AI मानवतेसाठी संहिता लिहित आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्याचबरोबर AI प्रणालीतील प्रचंड क्षमता आणि अंतर्निहित पक्षपात या दोन्ही बाजुंना अधोरेखित करताना तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देण्यासाठी सामूहिक जागतिक प्रयत्नांची गरज असल्याचं मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं आहे. पॅरिसमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ॲक्शन समिटमध्ये सह-अध्यक्ष असलेले मोदी बोलत होते.