विमान अर्ध्या वाटेवर गेल्यावर समजले वैमानिक... कोरोना पॉझिटिव्ह

टीम ई-सकाळ
शनिवार, 30 मे 2020

दिल्लीहून रशियाची राजधानी मॉस्कोला निघालेल्या एअर इंडियाच्या वैमानिकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुनंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे दिल्लीहून मॉस्कोच्या दिशेने निघालेले विमान अर्ध्या वाटेवरूनच पुन्हा परत बोलावण्याची वेळ एअर इंडियावर आली. आज सकाळी  दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रशियाची राजधानी मॉस्कोला जाण्यासाठी एअर इंडियाच्या या विमानाने उड्डाण केले होते.     

नवी दिल्ली : दिल्लीहून रशियाची राजधानी मॉस्कोला निघालेल्या एअर इंडियाच्या वैमानिकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुनंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे दिल्लीहून मॉस्कोच्या दिशेने निघालेले विमान अर्ध्या वाटेवरूनच पुन्हा परत बोलावण्याची वेळ एअर इंडियावर आली. आज सकाळी  दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रशियाची राजधानी मॉस्कोला जाण्यासाठी एअर इंडियाच्या या विमानाने उड्डाण केले होते.     

या राज्याने घातली तब्बल पाच राज्यातील लोकांना बंदी
 

'वंदे भारत' अभियानांतर्गत रशियाची राजधानी मॉस्को येथे अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी परत आणण्यासाठी, एअर इंडियाचे एअरबस ए ३२० हे विमान आज सकाळी ७ वाजता दिल्लीहून मॉस्कोला निघाले होते. या विमानातील एक वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास येताच तात्काळ माघारी बोलावण्याचे आदेश देण्यात आले. त्यावेळेस हे विमान मॉस्कोच्या अर्ध्या वाटेवर उझबेकिस्तान पर्यंत पोहचले होते. त्यानंतर पुन्हा हे विमान साडे बाराच्या दरम्यान दिल्ली विमानतळावर परतले. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून नागरी विमान वाहतूक महासंचालनालया (डीजीसीए) कडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सुदैवाने हे विमान रिक्त असल्याने मोठा धोका टळला.        

'लॉकडाउन-5' चा निर्णय कोणाच्या कोर्टात?   

प्रत्येक विमानाच्या उड्डाण आधी विमान व्यवस्थापन टीम कडून क्रू मेंबर्सचे रिपोर्ट तपासले जातात. एअर इंडियाकडून दिल्लीत क्रू मेंबर्सचे दिवसातून किमान २०० कोरोना चाचण्या घेतल्या जातात. आणि त्यांची तपासणी झाल्यानंतरच विमान उड्डाणास परवानगी देण्यात येते. पण यावेळेस वैमानिकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र नजरचुकीने हा अहवाल निगेटिव्ह समजून व्यवस्थापन टीमकडून विमानास हिरवा कंदील देण्यात आला असल्याचे समजते.           

एअर इंडियाचे हे विमान परतल्यानंतर सर्व क्रू मेंबर्सना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर या विमानाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे. शिवाय एअर इंडियाकडून आजच दुसरे विमान मॉस्कोला पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air India Delhi Moscow Flight Returns As Pilot Has COVID Probe Ordered