Airbnb कडून कर्मचाऱ्यांना खास सुविधा; ‘Live And Work Anywhere' ची मुभा | Airbnb Announces Flexible Facility For Employees | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Airbnb

Airbnb कडून कर्मचाऱ्यांना खास सुविधा; ‘Live And Work Anywhere' ची मुभा

जगात अश्या अनेक कंपन्या आहेत ज्या कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा करतात. आपल्या कर्मचाऱ्याला कोणाताही त्रास होऊ नये, यासाठी त्या नेहमी तत्पर असतात.अशातच एअरबीएनबी (Airbnb Inc) जी एक अमेरिकन कंपनी असून ऑनलाइन मार्केटप्लेस चालवते. या एअरबीएनबी (Airbnb Inc) ने गुरुवारी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिलाय. कंपनीचे कर्मचारी कायमस्वरूपी कोणत्याही ठिकाणाहून काम करू शकतील, असा निर्णय एअरबीएनबी घेतलाय. (Airbnb Announces Flexible Facility For Employees to live And Work Anywhere)

एअरबीएनबीचे सीईओ ब्रायन चेस्की यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. ट्वीट करताना ते म्हणाले आमचे कर्मचारी आता उत्तम काम करण्यास सक्षम आहे.जे कुठेही राहू शकतात आणि काम करू शकतात.

Airbnb ने कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्यांवरुन धोरण बनवले आहे. यात काही प्रमुख मुद्द्यांचा समावेश करण्यात आलाय.

१.तुम्ही घर किंवा ऑफिसमधून काम करू शकता जे तुमच्यासाठी चांगले असेल

2. तुम्ही सॅन फ्रान्सिस्को ते नॅशविल सारख्या देशात कुठेही जा आणि तुमची पगारात बदल होणार नाही

3. तुमच्याकडे प्रत्येक ठिकाणी 170 देशांमध्ये वर्षातील 90 दिवसांपर्यंत राहण्याची आणि काम करण्याची मुभा आहे

4. आपण नियमितपणे मीटींगसाठी भेटू.

Airbnb ने या धोरणाबाबत बोलताना ब्रायन चेस्की म्हणाले, जग अधिक फ्लेक्सिबल झाले. जर लाखो लोक Airbnbs मधून काम करत नसते तर आमचा व्यवसाय कोरोना सारख्या महामारीतून निघाला नसता. आमच्या कंपनीच्या इतिहासातील हा सर्वात उत्पादक दोन वर्षांचा कालावधी होता. त्यामुळे आम्ही या बाबत विचार केलाय आणि कर्मचाऱ्यांना कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची मुभा दिली आहे.