कोरोनामुळे स्वतःच्याच लग्नात पोहोचू शकला नाही नवरदेव; व्हिडीओ कॉलवरून पार पाडले विधी

चीनमधील एका नवरदेवाला स्वतःच्याच लग्नात पोहोचता आलं नाही.
China Groom Covid News
China Groom Covid NewsSakal

China Groom Covid News: चीनमध्ये कोरोनाबाबत 'झिरो पॉलिसी' सुरु आहे. आगामी काळात चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण शून्यावर आणण्यासाठी चिनी सरकार काम करत आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी कडक कारवाईही केली जात आहे. याकाळात चीनमध्ये लग्न करणंही सोपे काम राहिले नाही. असंच एक उदाहरण आता समोर आलं आहे. एका तरूणाचं लग्न होणार होते, परंतु कोरोनामुळे सगळा खेळच बिघडला. या नवरदेवाला स्वतःच्याच लग्नात पोहोचता आले नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

चीनमधील शिनजियांगमधील उरुमकी येथील (Urumqi) हे प्रकरण आहे. येथे डेंग नावाचा एक व्यक्ती आपल्या लग्न समारंभासाठी रेस्टॉरंटमध्ये जात असताना रेस्टॉरंटने त्याला अडवले. Scmp नुसार, त्या व्यक्तीने सांगितले की, रेस्टॉरंटच्या लोकांनी लग्नाच्या एक दिवस आधी त्याला कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र द्यावे लागेल असे सांगितले होते. त्याच्याकडे जे सर्टीफिकेट होतं ते चार दिवसांपूर्वीचं होतं. ज्याची वैधता संपली होती. (The groom could not attend his own wedding due to Corona, watching the wedding rituals on the video)

China Groom Covid News
ऑनलाईन लग्न, ऑफलाईन भोजन! अनोख्या लग्नाची चर्चा तर होणारच

पुन्हा नव्याने चाचणी करण्यासाठी गेला-

रेस्टॉरंटच्या नियमानुसार डेंगची चाचणी वैध ठरली नाही. ती कालबाह्य झाली होता. त्यानंतर तो जवळच्या रुग्णालयात पुन्हा तपासणीसाठी गेला. यादरम्यानच त्याचा विवाह सोहळा सुरू झाला आणि तो उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे त्याला लाइव्हच्या माध्यमातून लग्नाला हजेरी लावावी लागली. रेस्टॉरंटच्या बाहेर बसून लाइव्ह व्हिडिओद्वारे तो स्वतःच्या लग्नात सामील झाला.

मित्रांनी बनवला व्हिडिओ-

यादरम्यान त्याच्या मित्रांनी त्याचा व्हिडिओ बनवला होता. डेंगसोबत लग्नात आणखी 20 पाहुणे उपस्थित राहू शकले नाहीत. तो रडत होता पण त्यांच्या मित्रांनी त्याला हसवले आणि व्हिडीओसुद्धा बनवला.

China Groom Covid News
विवाह सोहळ्यातील खर्च टाळून शाळेला मदत

वधू काय म्हणाली?

डेंगची वधू, लीने सांगितले की, त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने हा सोहळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तिला कळले की डेंग लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही, तेव्हा तिने आधी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पण पाहुणे आणि कुटुंबातील सर्वजण हजर असल्याचे पाहून त्यांनी लग्न रद्द करण्याचा विचार काढून टाकला.

संध्याकाळी सामील झाला-

संध्याकाळी पाचच्या सुमारास डेंगचा निगेटिव्ह रिपोर्ट आला आणि डेंगने त्याच्या लग्नाला हजेरी लावली आणि बाकीचे मित्र आणि इतर सर्वांसोबत फोटो काढले आणि खूप मजा केली. हे लग्न संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालले. त्याचा हा व्हिडिओ चीनमध्ये व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com