जगातील सर्वात क्रूर दहशतवादी बगदादीला 'कुत्र्यासारखं मरण'

दोन वर्षांपूर्वी जगातील सर्वात क्रूर दहशतवादी ठार झाला. इसिसचा नेता अबू बक्र अल बगदादीने त्याच्या मुलांची हत्या केली.
al-baghdadi
al-baghdadi

ऑक्टोबर २०१९ मध्ये, अनेक वर्षांच्या लपाछपीनंतर अमेरिकन सैन्याने वायव्य सीरियात बगदादी राहत असलेले ठिकाण शोधून काढले. एकूण आठ हेलिकाॅप्टर्स ७० इलिट डेल्टा फोर्स तुकडी घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. हा प्रदेश रशिया आणि सीरियाच्या नियंत्रणात. सैनिकांनी रात्री घातले जाणारे विशेष असे गाॅगल घातले होते. बगदादी गोपनीय अशा बोगद्यातून त्याच्या मुलांबरोबर पळाला. सैन्याने पाठलाग केला. इसिस प्रमुखाने स्वतःबरोबरच आपल्या मुलांचीही हत्या केली. बर झाल की सैनिक आणि त्यांना आणलेल्या जनावरांचे प्राण वाचले. अमेरिकन सैनिकांनी अनेक (Abu Bakr Al-Baghdadi) नागरिकांना वाचवले. यात ११ मुले होते. मात्र बगदादीने स्वतःबरोबर नेलेली त्या दोन मुलांना सैनिक वाचू शकले नाहीत. तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) म्हणाले, की बगदादी हा श्वानासारखा मेला. एक ठग जो इतरांना घाबरवत होता. त्याचा शेवटचा क्षण भीतीत गेला.

al-baghdadi
दक्षिण सुदान- राजकीय संघर्षाचा बळी

एकूण वेदना आणि प्रचंड भीती, अमेरिकन सैनिकांनी त्याला चांगली अद्दल घडवल्याचे ट्रम्प म्हणाले. २०१४ मध्ये मोसूल मधील ग्रँड मशिद ताब्यात घेतल्यानंतर बगदादी जगासमोर पहिल्यांदा आला होता. जिहादी प्रमुखाने इस्लामिक खलिफत आणि स्वतःला खलिफ इब्राहिम अशी पदवी जाहीर केली. शेवटच्या एका व्हिडिओत साधारण २०१९ पूर्वीचा असेल, त्यात तो पश्चिम देशांवर हल्ल्याचे आवाहन करत होता. भूमिगत झाल्यावर त्याला घोस्ट नावाने संबोधले जाऊ लागले. २०१७ च्या अखेरीस इसिसचे बहुतेक भागावरील नियंत्रण सुटले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com