
थोडक्यात
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझा येथे अल-जझीराचे पाच पत्रकार ठार झाले, त्यात अनस अल शरीफ यांचा समावेश.
IDF ने दावा केला की अनस हमास युनिटचा प्रमुख होता आणि त्यालाच लक्ष्य करण्यात आले.
अल जझीराने आधीच अनसच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती.
Al Jazeera Journalists killed: अरब देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क असलेल्या अल-जझीराचे पाच पत्रकार इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. गाझा येथील अल शिफा रुग्णालयाजवळ इस्रायलने केलेल्या हल्ल्यात पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत असे अल जझीराने वृत्त दिले आहे. गाझा येथील पत्रकारांसाठी बांधलेल्या तंबूवर झालेल्या हल्ल्यात हे मृत्यू झाले आहेत. इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अल जझीराचे प्रसिद्ध पत्रकार अनस अल शरीफ आणि त्यांचे चार साथीदारांचा समावेश आहे.