Al Shifa Hospital : रुग्णालयाला आली युद्धभूमीची कळा,जागतिक आरोग्य संघटनेचे निरीक्षण; गाझात सर्वत्र बाँबहल्ल्याच्या खुणा

हे रुग्णालय आता पूर्णपणे रिक्त केले गेले
Al Shifa Hospital
Al Shifa Hospital esakal

खान युनिस : गाझा पट्टीतील सर्वांत मोठे रुग्णालय असलेले आणि मागील काही दिवसांपासून संघर्षाचे केंद्र बनलेले अल शिफा रुग्णालयाला युद्धभूमीची कळा आली असल्याचे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. हे रुग्णालय आता पूर्णपणे रिक्त केले गेले असले तरी येथे सर्वत्र बाँबहल्ल्याच्या आणि गोळीबाराच्या खुणा दिसत होत्या.

अल शिफा रुग्णालयाच्या परिसरात हमासचे दहशतवादी लपले असल्याचे सांगत इस्राईलकडून अनेक दिवसांपासून येथे जोरदार बाँबहल्ले सुरु आहेत. यावरून इस्राईलवर प्रचंड टीका झाली होती. काल (ता. १८) बहुतांश रुग्ण आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविल्यानंतर आज सैनिकांनी रुग्णालयातील आणखी २९१ रुग्णांनाही सुरक्षितपणे बाहेर काढले. यामध्ये अत्यंत चिंताजनक परिस्थितीत असलेल्या ३२ बालकांचाही समावेश होता.

Al Shifa Hospital
Skin Care Tips : त्वचेसाठी फायदेशीर आहे गव्हाचे पीठ, ‘या’ पद्धतीने करा वापर

अद्यापही किमान तीनशे रुग्ण असल्याचे इस्राईलने सांगितले. यानंतर ‘डब्लूएचओ’ अधिकाऱ्यांनी एक तासासाठी रुग्णालयाला भेट दिली. हे रुग्णालय म्हणजे युद्धभूमीच असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयात ठिकठिकाणी बाँबस्फोट झाल्याच्या आणि गोळीबार झाल्याच्या खुणा दिसत आहेत. प्रवेशद्वाराजवळ तर अनेक जणांना दफन केल्याचेही आढळून आले. रुग्णालयाच्या आवारात जवळपास ८० जणांना पुरल्याचे वर वर केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. अद्यापही रुग्णालयात असलेल्या आणि गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना दुसरीकडे हलविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Al Shifa Hospital
Health Tips: वेळेची कमतरता असेल तर फक्त 10 मिनिटांत करा फुल बॉडी वर्कआउट

करारासाठी प्रयत्न सुरु

हमासने सात ऑक्टोबरला हल्ला केल्यानंतर अपहरण केलेले दोनशेहून अधिक जण अद्यापही त्यांच्याच ताब्यात आहेत. या सर्वांची सुटका करण्यासाठी इस्राईल, हमास व अमेरिका यांच्यात कराराबाबत बोलणी सुरू असल्याचे अमेरिकेने सांगितले. या बदल्यात पाच दिवसांसाठी हल्ले थांबविण्याची इस्राईलची तयारी आहे. मात्र, अद्याप कराराबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com