Alexander Graham Bel : ग्रॅहम बेल यांच्यामूळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे प्राण वाचले असते, पण…

ग्रॅहम बेल यांच्या बाळाच्या मृत्यूनंतरही त्यांनी एक संशोधन केले
Alexander Graham Bel : ग्रॅहम बेल यांच्यामूळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे प्राण वाचले असते, पण…
Updated on

हॅलो, तूम्ही आता ज्या फोनवरून सतत हॅलो, हॅलो करता ती कल्पना कुणाच्या बरं डोक्यात आला असेल. असा विचार तूम्हीही कधी केलाय का? त्या व्यक्तीचे नाव आहे महान संशोधक ग्रॅहम बेल. आज ग्रॅहम बेल यांचा स्मृतिदीन. याच पार्श्वभूमीवर त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.

ग्रॅहम बेल यांना टेलीफोनचे जनक म्हणून संपूर्ण जग यांना ओळखत आहे. टेलिफोनसोबतच त्यांनी अनेक शोध लावले आहेत.  अगदी लहान असल्यापासूनच ग्रॅहम बेलनी विविध प्रकारचे शोध लावायला सुरुवात केली होती. त्यांच्या सुरुवातीच्या पहिल्या प्रकल्पांपैकी एक प्रकल्प हा गव्हापासून त्याचा भुसा वेगळा करण्यासंदर्भातील होता. 

Alexander Graham Bel : ग्रॅहम बेल यांच्यामूळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे प्राण वाचले असते, पण…
Pankaja Munde: गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत पंकजा मुंडे भावुक, 'आम्हाला भाऊ...

प्रा.अलेक्झांडर ग्रॅहम बेलचा जन्म एडिबरोमधला (स्कॉटलंड), ३ मार्च १८४७ साली झाला. त्याचे आजोबा व वडील हे इंग्लंडमध्ये भाषण, उच्चारशुद्धी व वक्तृत्वविकसन याबाबत प्रसिद्ध होते. त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन बेलने भाषण व संप्रेषण याबाबत प्रशिक्षण घेतले.

Alexander Graham Bel : ग्रॅहम बेल यांच्यामूळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे प्राण वाचले असते, पण…
Sandip Deshpande : Sanjay Raut यांनी Eknath Shinde यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली यावर देशपांडेंनी सडकून टीका केली

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ग्रॅहम बेल यांनी एका मुलांच्या निवासी शाळेत शिकवण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या वडिलांनी व्हिजिबल स्पीच ही पद्धत तयार केली होती. एखादा शब्द तयार होण्यासाठी आवाज कसे तयार होतात त्यासाठी ओठांच्या हालचाली कशा होतात, याचा त्यात समावेश होता.हीच पद्धत बेल यांनी कर्णबधीर मुलांना बोलायला शिकवण्यासाठी आणि त्यांचे उच्चार अधिक स्पष्ट करण्यासाठी वापरली. त्यांनी स्वतःच्या काही पद्धतीही तयार केल्या.

Alexander Graham Bel : ग्रॅहम बेल यांच्यामूळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे प्राण वाचले असते, पण…
Pune Accident News : भरधाव कंटेनरने पायी जाणा-या विद्यार्थ्यांना चिरडले

तर आज टेलिफोनचे जनक कोणीतरी वेगळे असते

ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनच्या शोधासाठी अनेक वर्षे संशोधन केले. त्या जोरावर त्यांनी १४ फेब्रुवारी १८७६ रोजी पेटंटसाठी अर्ज दिला. त्याच दिवशी एलिशा ग्रे यांच्यासाठी काम करणाऱ्या एका वकिलानेही अशाच संशोधनासाठी अर्ज सादर केला. बेल यांनी वडिलांना लिहिलेल्या पत्रानुसार कोणीतरी आपल्या सारखाच शोध लावत असल्याचा अंदाज त्यांना आला होता. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर अर्ज केला होता. त्यामुळे काही तासांच्या फरकामुळे बेल यांना या शोधाचे क्रेडीट मिळू शकले. मार्च १८७६ मध्ये बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले. 

Alexander Graham Bel : ग्रॅहम बेल यांच्यामूळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे प्राण वाचले असते, पण…
Pune Crime News: बेकायदा अफूची शेती करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

असं म्हणतात की त्यांच्या बाळाचा जगात आल्यानंतर काहीच तासात मृत्यू झाला. त्या बाळाला श्वास घेण्यात अडथळा होता. त्यामुळे श्वासोछ्वास घेता न येणाऱ्या लोकांसाठी त्यांनी मेटल व्हॅक्क्यूम जॅकेट तयार केले. कल्पनेतून पुढे पोलिओच्या रुग्णांच्या उपचारात कामी येणारे उपकरण तयार केले गेले होते. 

Alexander Graham Bel : ग्रॅहम बेल यांच्यामूळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे प्राण वाचले असते, पण…
Alexander Graham Bell : फोन उचलल्यावर Hello बोलावं का? दोन शास्त्रज्ञांमध्ये झालं होतं भांडण

जेम्स गारफिल्ड हे अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष होते. 1881 मध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली होती. याच वर्षी  त्यांच्यावर 1881 मध्ये हल्ला झाला होता. 81 च्या सप्टेंबरमध्ये एका मारेकऱ्याच्या गोळीने त्यांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या अध्यक्षीय इतिहासातील दुसरे सर्वात कमी कालावधी कार्यकाल असलेले अध्यक्ष ठरले.

जेम्स गारफिल्ड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या शरीरात घुसलेली गोळी काढण्यासाठी ग्रॅहम यांना बोलवण्यात आले. शरिरात गोळी कुठे आहे हे शोधण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेट मशिन वापरले होते. गारफिल्ड यांना वाचवण्यात यश आले नाही.

त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेट मशिनमध्ये अधिक सुधारणा करण्यात आली. आणि सध्या वापरात असलेले मेटल डिटेक्टर बनवण्यात आले आहे.

Alexander Graham Bel : ग्रॅहम बेल यांच्यामूळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे प्राण वाचले असते, पण…
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com