टक्कर दोन महासागरांची

अटलांटिक, पॅिसफिकचा ‘इनर्शिया इफेक्ट’
टक्कर दोन महासागरांची

जगात खरे तर पाच, पण फोडनावानुसार सात महासागर आहेत. (world oceans day) लेखातील छायाचित्रात दोन महासमुद्र एकमेकांत मिसळत नसल्याचे दिसते. (8 june 2021)हे दोन महासमुद्र आहेत अटलांटिक आणि पॅसिफिक महासमुद्र. (world ocean day 2021 theme) हे एकमेकांत मिसळत का नाहीत. (june 8 special day) त्याची कारणं म्हणजे वेगवेगळे गुणधर्म पाण्याची घनता, पाण्याचा (केमिकल प्रॉपर्टी) रासायनिक गुणधर्म, क्षारांचे प्रमाण, टेनसाईल स्ट्रेंग्थ, भौतिक आणि जैविक गुणधर्म, सर्वांत शेवटी पण महत्त्वाचे कारण म्हणजे ‘इनर्शिया इफेक्ट’. (ocean day)

इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर, टोकियो, जपान

दोन महासमुद्र एकत्र तर आले; पण एकमेकांत मिसळत नाहीत. खारं पाणी आणि एकमेकांत कसं काय मिसळत नसेल? पृथ्वीचा गोल अवकाशातून पाहिला तर जवळपास ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. तो ७१ टक्के भाग म्हणजे एक महासमुद्र आहेच, हे सर्वश्रुत आहे. महासमुद्राला वेगवेगळी नावं देऊन वेगळे समुद्र का केले असावेत, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहेच की. नाही का? त्यासाठी भूगोलाच्या इतिहासात घुसायलाच हवे. समुद्र म्हणजे इंग्लिशमध्ये OCEAN. हा इंग्लिश शब्द मुळात लॅटिनमधून आलेला. मूळ शब्द आहे OKEANOS. या शब्दाचा अर्थ आहे,‘पाण्याचा एक अतिविशाल प्रवाह जो पृथ्वीच्या गोलाच्या परिक्रमा करतो.’

इ. स. पूर्वीपासून समुद्रातील जलप्रवास, जलवाहतूक सुरू आहे. (world ocean day quotes) म्हणजेच मानव हजारो वर्षांपासून समुद्र सफर करीत आलाय. मानवाने केलेली एक गोष्ट इतर प्राण्यांपासून वेगळी बनवते ती म्हणजे आकलन शक्ती आणि विचारशक्ती. (ocean day 2021) त्यामुळेच समुद्राच्या दिसतील त्या नोंदी ठेवायला सुरू केल्या. या नोंदी एकत्र करत एक छान असा माहिती संग्रह तयार झाला. (world ocean day 2021) महासमुद्र जरी एक असला तरी त्या त्या भागातील भौगोलिक स्थिती, पाण्याच्या प्रवाहाची दिशा आणि गती, शेजारील देश, ऐतिहासिक घटना आणि वैज्ञानिक माहिती या गोष्टी गृहीत धरून त्या त्या महासमुद्रांची नावं ठेवली गेली.

टक्कर दोन महासागरांची
न्यूड फोटो FBवर लीक, iPhone ला मोजावे लागतायेत कोट्यवधी रुपये

महासागरांचा अवाढव्य आकार

महासमुद्रांची सीमा ठरवण्यासाठी सन १९१९ मध्ये २४ देशांनी मिळून एक समिती स्थापन केली. या समितीने सीमा निश्चित करत मान्यता दिली. सीमांचे पुनरावलोकन १९२८, १९२७, १९५३ आणि २००२ मध्ये करण्यात आले आणि एकूण पाच महासमुद्र ठरवले गेले. ते असे ः पॅसिफिक(६ कोटी, ४० लाख वर्ग मैल (कि. मी.नव्हे), अटलांटिक (३ कोटी, २० लाख वर्ग मैल), हिंदी(इंडियन) (२ करोड, ८० लाख वर्ग मैल), आर्क्टिक (५० लाख वर्ग मैल), अंटार्क्टिक (२ करोड ३ लाख वर्ग मैल).

पाकिस्तान, इंडोनेशियाची चिंधीगिरी

हिंदी महासागर (इंडियन)नावाला १९६० च्या दशकात इंडोनेशिया व पाकिस्तानने विरोध दर्शवत याचे नाव ‘इंडोनेशियन’ किंवा ‘एशियन’ करावे म्हणून आग्रह धरला होता. कोणाकोणाची काय काय चिंधीगिरी सुरू असते बघा.

पाचाचे झाले सात महासागर

सहसा सातसमुद्र, सातासुमद्रापार असा शब्द प्रयोग करतो. मग महासागर पाच तर हे जादाचे दोन कोटून आले. पॅसिफिक आणि अटलांटिक यांचे दोन दोन भाग करून उत्तर पॅसिफिक व उत्तर अटलांटिक आणि दक्षिण पॅसिफिक व दक्षिण अटलांटिक अशी नावं सोयीसाठी तयार केल्यामुळे आणखी दोन महासागर तयार झाले इतकंच. म्हणजेच पृथ्वीवर सात महासमुद्र आहेत हे नक्की.

टक्कर दोन महासागरांची
धक्कादायक! पाळीव मांजरींनी खाल्लं मृत मालकिणीचं शरीर

आता मूळ मुद्यावर येऊ. छायाचित्रात दोन महासमुद्र एकमेकांत मिसळत नसल्याचे दिसते हे दोन महासमुद्र आहेत अटलांटिक आणि पॅसिफिक महासमुद्र. हे एकमेकांत मिसळत का नाहीत. त्याची कारणं म्हणजे वेगवेगळे गुणधर्म ः पाण्याची घनता, पाण्याचा (केमिकल प्रॉपर्टी) रासायनिक गुणधर्म, क्षारांचे प्रमाण, टेनसाईल स्ट्रेंग्थ, भौतिक आणि जैविक गुणधर्म, सर्वांत शेवटी पण महत्त्वाचे कारण म्हणजे ‘इनर्शिया इफेक्ट’. ही कारण सविस्तर पाहू. द्रवाच्या घनता ज्यावेळी वेगवेगळ्या असतात. त्या एकमेकांत मिसळण्यास वेळ लागतो. त्यांचे अणू रेणू यांची रासायनिक प्रक्रिया होण्यासाठी ते दोन्ही ठराविक काळ एकत्र राहणे जरुरी असते. इथं ही प्रक्रिया घडायला वेळच नसतो. प्रत्येक महासमुद्र आणि समुद्र यांच्या पाण्याला एक गती असते. पाण्याचा प्रवाह वाहता असतो. त्याला वॉटर करंट असं संबोधतात. त्याची गती ही त्या त्या भौगोलिक, भौतिक परिस्थितीनुसार वेगवेगळी, बदलणारी असते. पाण्याचे रंगही वेगवेगळे दिसतात कारण क्षार प्रमाणात आणि रासायनिक गुधर्मातील बदलामुळे रंग वेगळा दिसतो. दोन्ही पाण्यात जेंव्हा एका पेक्षा दुसऱ्याची कमीत कमी पाचपट क्षारता प्रमाण जास्त असते तेंव्हा त्या दोन्ही पाण्यातील रंगांतील फरक मानवी डोळ्यांनी पाहू शकतो.

प्रवाह तयार होतात तरी कसे..?

पृथ्वीला जर आपण सूर्यावर जाऊन पाहिले तर ती अक्षावर डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे फिरत असलेली दिसेल. म्हणजेच पृथ्वीला जर उत्तर ध्रुवावरील अवकाशातून पाहिले तर पृथ्वी घड्याळाच्या काट्यांच्याविरुद्ध दिशेने फिरताना दिसेल. पृथ्वी जेंव्हा अक्षावर फिरत असते तेंव्हा सगळे महाद्वीप, महासमुद्र त्याच गतीने फिरत असतात. जो जमीनीचा भाग आहे तो तर स्थिर आहे. तो पृथ्वीच्याच गतीने फिरणार. पण समुद्राचे पाणी तरंगते असल्याने त्याची गती जरी तीच असली तरी ते थोडे मागे राहते. पाणी पृथ्वीच्या वेगाने ओढले जाते. त्यालाच ‘इनर्शिया इफेक्ट’ म्हणतात. यात आणखी एक मुद्दा म्हणजे पाणी असो व हवा नेहमी गरम तापमानाकडून थंड तापमानाकडे प्रवाहित होतात.

हा नैसर्गिक गुणधर्म आहे. पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवांकडे हे पाणी सतत विषुववृत्तीय भागातून प्रवाहित होत असते. हा पाण्याचा प्रवाह दोन्ही ध्रुवांकडे एकमेकांविरूद्ध दिशेने सुरू असतो. पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगामुळे या पाण्याच्या दोन्ही दिशा काटकोनात एकत्र मिळून यांना एक चक्री गती मिळते. मग या दोन्ही चक्रीची दिशा परस्परविरोधी होतात. पाण्याच्या घनतेनुसार यागतीत फरक पडलेला असतो. असे दोन वेगवेगळ्या गतीचे, परस्परविरोधी दिशेत फिरणारे आणि वेगवेगळ्या घनता, रासायनिक आणि भौतिक गुणधर्माचे समुद्र एकमेकाला भिडतात पण एकमेकांत मिसळत नाहीत. जणू शोले चित्रपटात ठाकूर (संजीवकुमार) गब्बर (अमजद खान) समोरासमोर आले; पण दुश्‍मनी घेऊन. महासागर समोर येतात. त्यांच्यात दोस्ती होत नाही असं नाही. त्यांना एकमेकांत मिसळायला वेळच मिळत नाही.

टक्कर दोन महासागरांची
तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन सी कमी झालंय का? अशी आहेत लक्षणे

जगात अशी १५ ठिकाणे...

जगात अशा किमान १५ ठिकाणी नद्या व समुद्र, महासागर यांच्याबाबत घटना घडतात. भारतात कन्याकुमारी या ठिकाणी दोन समुद्र, तर देवप्रयाग येथे अलकनंदा व भागीरथी या नद्यांच्या संगमावर बऱ्याच अंतरापर्यंत नदीचे दोन्ही प्रवाह स्वतंत्र दिसतात. नद्या एकाच दिशेने प्रवाहित असल्याने काही अंतर जाऊन मिळतात. महासागरांचे मात्र तसे होत नाही.

- बाळासाहेब पाटोळे,

इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर, टोकियो, जपान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com