esakal | अमेरिकेत पुन्हा गोळीबार; 8 जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:ला संपवले
sakal

बोलून बातमी शोधा

अमेरिकेत गोळीबार; 8 जण ठार, हल्लेखोराने स्वत:ला संपवले

एका 57 वर्षीय व्यक्तीने केलेल्या गोळीबारामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत गोळीबार; 8 जण ठार, हल्लेखोराने स्वत:ला संपवले

sakal_logo
By
सूरज यादव

सॅन जोस - अमेकिरिकेत (America) पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. कॅलिफोर्नियातील (California) सॅन जोस रेल्वे यार्डात एका 57 वर्षीय व्यक्तीने केलेल्या गोळीबारामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्निया पोलिसांनी गोळीबार करणाऱ्याची ओळख पटवली आहे. त्याचं नाव सॅम्युअल जेम्स कॅसिडी असल्याचं सांगण्यात आलं आहे. तो मेंटेनन्स वर्कर म्हणून काम करत होता. गोळीबारानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडून घेतली.

हल्ल्यात कितीजण जखमी झाले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण यामध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सांता क्लारा व्हॅली ट्रान्सपोर्ट अथॉरीटीमध्ये हल्लेखोर काम करत होता. सॅम्युअलचे मानसिक संतुलन ठिक नव्हते अशीही माहिती समोर येत आहे.

हेही वाचा: मेहुल चोक्सी डोमिनिकामध्ये सापडला; सीआयडीने घेतलं ताब्यात

गेल्या काही महिन्यात अमेरिकेतील गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अलिकडच्या काळात यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मोठ्या पार्ट्या, कार्यक्रम, मॉल्स, शाळांमध्ये हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे प्रकार काही महिन्यात घडले. यात अनेकांचा जीव गेला आहे.