esakal | फरार मेहुल चोक्सी डोमिनिकामध्ये सापडला; सीआयडीने घेतलं ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Mehul Choski's  run away from Antigua

मेहुल चोक्सी डोमिनिकामध्ये सापडला; सीआयडीने घेतलं ताब्यात

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - पीएनबी घोटाळा (PNB Scam) प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेला मेहुल चोक्सी (Mehul Choksi) एटिग्वातून (Antigua) बेपत्ता झाला होता. मंगळवारी त्याला डोमिनिकामध्ये (Dominica) सीआय़डीने ताब्यात घेतलं आहे. आता मेहुल चोक्सीला डोमिनिका आय़लँड पोलिसांच्या ताब्यात आहे. तो क्युबाला जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यानंतर अनेक तास त्याची चौकशी करण्यात आली. आता त्याला पुन्हा एंटिग्वाला पाठवण्याची तयारी केली जात असून यासाठी इंटरपोलची मदत घेतली जाणार आहे. (pnb scam mehul choksi in custody of cid dominica)

मेहुल चोक्सी गेल्या रविवारी 23 मे रोजी सांयकाळी साडेपाचच्या सुमारास कार घेऊन घरातून निघाला होता. मात्र तो घरी परतलाच नाही. त्याची कार परिसरातच बेवारस स्थितीत आढळली होती. यानंतर कुटुंबियांसह मेहुल चोक्सीचे भारतातील वकील विजय अग्रवाल यांनी तो बेपत्ता झाल्याचं सांगितलं. त्यानंतर रॉयल पोलिस फोर्स मेहुल चोक्सीचा शोध घ्यायला लागली.

हेही वाचा: जगातील सर्वाधिक शक्तीशाली नेत्यांची होणार भेट

एंटिग्वातील जॉली हार्बर भागात मेहुल चोक्सी बराच काळ वास्तव्यास आहे. 2018 मध्ये चोक्सी भारत सोडून पळून गेला होता. त्यानंतर देशातील तपास संस्था सीबीआय आणि ईडीची पथके त्याचे भारताकडे प्रत्यार्पण व्हावे यासाठी प्रयत्न करत होत्या. मेहुल चोक्सीने अनेक बँकांची जवळपास 13 हजार 500 कोटी रुपयांची फसवणूक केली असून त्याचे नाव डिफॉल्टरच्या यादीत सर्वात वर आहे.