ट्रम्प ठेवणार मोदींच्या पावलावर पाऊल; चीनबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता

वृत्तसंस्था
Tuesday, 7 July 2020

सरकारने टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. आता अमेरिकाही याच मार्गाने जाण्याची शक्यता आहे. टिकटॉकसह अन्य चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणण्यासाठी अमेरिका गंभीरतेने विचार करत आहे

वॉशिंग्टन- भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील स्थिती स्फोटक बनली होती. त्यानंतर भारत सरकारने चीनला धडा शिकवण्यासाठी आक्रमकता दाखवली. सरकारने टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. आता अमेरिकाही याच मार्गाने जाण्याची शक्यता आहे. टिकटॉकसह अन्य चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणण्यासाठी अमेरिका गंभीरतेने विचार करत आहे. 

महत्त्वाची बातमी! व्हिसाबाबत अमेरिकेने घेतलाय मोठा निर्णय
अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पोम्पियो यांनी याबाबतचे सुतोवाच केले आहेत. चिनी अ‍ॅप्सवर आम्ही बंदी आणण्याचा विचार करत आहोत, असं ते म्हणाले आहेत. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्येही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे चीन विरोधात जगात वातावरण चांगलंच तापत असल्याचं दिसत आहे. भारतात टिकटॉक बंद झाल्याने चिनी कंपनीला जवळजवळ 6 अब्ज डॉलर नुसकान झालं असल्याचं सांगितलं जातंय.

15 जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यामुळे चीन विरोधात भारतात संतापाची लाट पसरली होती. अनेकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे सुरु केले होते. तसेच अनेकांनी आपल्या मोबाईलमधून चिनी अ‍ॅप डिलिट केले होते. अशात भारत सरकारकडून 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. चिनी अ‍ॅप्समुळे भारताची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धोका असल्याचं भारताकडून सांगण्यात आलं होतं. तसेच चिनी कंपन्या वापरकर्त्यांची माहिती चोरुन चीनला देत असल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला होता. 

अठरा गावांचे आरोग्य सांभाळणाऱ्या जैतापूर आरोग्य केंद्रात रिक्त पदांमुळे...
विशेष म्हणजे टिकटॉक हे चिनी अ‍ॅप असले तरी चीनमध्येच यावर बंदी आहे. कंपनी निकषांचं पालन करत नसल्याने चीनमध्ये या अ‍ॅपवर बंदी आहे. टिकटॉकचे सीईओ केविन मेयर यांनी भारत सरकारला पत्र लिहून चीनला कधीही वापरकर्त्याची माहिती दिली नसल्याचं म्हटलं होतं. तसेच भारतीय वापरकर्त्यांचा डेटा सिंगापूरच्या सर्व्हरमध्ये साठवला जातो. चीनने कधी या डेटाची मागणी केली आहे ना आम्ही कधी त्यांना ती देऊ, असं स्पष्टीकरण टिकटॉककडून देण्यात आलं होतं.

दरम्यान, 2017 मध्ये टिकटॉक लाँन्च झाले होते. भारतात मोठ्या प्रमाणात टिकटॉकचे वापरकर्त्ये आहेत. भारतात जवळजवळ 20 कोटी लोक टिकटॉक वापरतात. मात्र, भारत सरकारने या अ‍ॅप्सवर बंदी आणल्याने त्यांना अन्य अ‍ॅप्सचा पर्याय शोधावा लागणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america can follow path of narendra modi