

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांविरोधात मोहीम उघडली आहे. अमेरिकेच्या यंत्रणांना अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्यांना देशाबाहेर पाठवण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेने लष्करी विमानाने अवैध भारतीय स्थलांतरितांना भारतात पाठवलं. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार हे सर्व भारतीय २४ तासांनी भारतात परतण्याची शक्यता आहे. यासोबतच अमेरिकेनं पेपरलेस म्हणजेच कोणत्याही कागदपत्रांशिवाय अमेरिकेत असलेल्या भारतीयांविरोधात कारवाईला सुरुवात केलीय. २०५ भारतीयांना घेऊन निघालेलं विमान अमृतसरमध्ये उतरणार आहे.