हे वर्ष संपायच्या आतच अमेरिकेकडे असेल लस; निवडणुक प्रचारात ट्रम्प यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

ट्रम्प यांनी बुधवारी म्हटलं की हे वर्ष संपायच्या आतच अमेरिकेजवळ कोविड-19 वर सुरक्षित आणि प्रभावी लस उपलब्ध असेल.

वॉशिंग्टन : अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणुक आता दिवसेंदिवस चुरशीची बनत आहे. रिपब्लिक पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांचे आव्हान आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या निवडणुका जगासाठीच अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत. अमेरिकेत कोरोनाचे संकट तीव्र असातानाही अमेरिकेच्या या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवरच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी एक मोठं विधान केलं आहे.

ट्रम्प यांनी बुधवारी म्हटलं की हे वर्ष संपायच्या आतच अमेरिकेजवळ कोविड-19 वर सुरक्षित आणि प्रभावी लस उपलब्ध असेल. त्यांनी देशातील कॉर्पोरेट क्षेत्राला विश्वास देण्याचा प्रयत्न केला कि जर ते पुन्हा एकदा निवडूण आले तर ते आशा, संधी आणि विकासाला पुढे नेतील. डोनाल्ड ट्रम्प हे 1 ऑक्टोबर रोजी कोरोना संक्रमित झाले होते. त्यानंतर चार दिवस आणि तीन रात्री दवाखान्यात काढल्यानंतर ते आता कोरोनापासून मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. 

हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, "मला सुपरमॅन झाल्यासारखं वाटतय"
व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांनी त्यांना आता निवडणुकीच्या प्रचार रॅलीमध्ये सामिल होण्याची परवानगी दिली आहे. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधूनच न्यू-यॉर्क,  शिकागो, फ्लोरिडा, पिट्सबर्ग, शोबोयगन, वॉशिंग्टन डीसीतील इकॉनॉमिक क्लबला संबोधित करताना म्हटलं की, अमेरिकेसमोर सोपे पर्याय आहेत. एकतर अमेरिका समर्थक धोरणांनुसार ऐतिहासिक अशी समृद्धी  तुम्हाला हवीय की कट्टर डाव्या विचारसरणीच्या अंतर्गत अतिगरिबी आणि मंदी हवीय?  असा सवालही त्यांनी मतदारांना केला. 

हेही वाचा - दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग होणे शक्य; अमेरिकेत रुग्ण आढळला

तर 20 दिवसांत चीनवर अमेरिकेचा ताबा
ट्रम्प यांनी हा दावा केलाय की चीनने जगात हा व्हायरस पसरवला आहे. या महामारीला केवळ ट्रम्प प्रशासनच सडेतोड उत्तर  देऊ शकतं. जर मी निवडुण नाही आलो तर 20 दिवसांच्या आतच चीनने अमेरिकेवर ताबा घेतलेला असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: America donald trump says America will have covid19 vaccine before end of this year