बायडेन विजयपथावर

पीटीआय
Friday, 6 November 2020

अत्यंत तुल्यबळ ठरत असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कालच्या तुलनेत आज मतमोजणीची गाडी थोडीशी पुढे सरकली. यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांना आणखी सहा इलेक्टोरल मतांची आवश्‍यकता आहे.

अद्यापही लाखो मतपत्रिकांची मोजणी बाकी
वॉशिंग्टन - अत्यंत तुल्यबळ ठरत असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कालच्या तुलनेत आज मतमोजणीची गाडी थोडीशी पुढे सरकली. यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांना आणखी सहा इलेक्टोरल मतांची आवश्‍यकता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बहुमतासाठी तब्बल ५६ मतांची आवश्‍यकता असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनीही विजय मिळण्याची आशा कायम ठेवली आहे. कोरोना संसर्गाच्या स्थितीमुळे प्रचंड प्रमाणात झालेले टपालाद्वारे मतदान हे यंदाच्या विलंबाचे प्रमुख कारण ठरत आहे.

US Election - ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या; मतमोजणीत घोटाळ्याचा आरोप निवडणूक निरीक्षकांनी फेटाळला

विविध माध्यमांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, ज्यो बायडेन यांना विजयासाठी ६ ते १७ इलेक्टोरल मते कमी पडत आहेत. ट्रम्प यांचा रथ २१४ जागांवर अडकला आहे. अध्यक्ष होण्यासाठी एकूण ५३८ पैकी २७० इलेक्टोरल मते मिळणे अत्यावश्‍यक आहे. मतपत्रिकांची मोजणी, पेनसिल्वानिया राज्यात मतपत्रिका स्वीकारण्यासाठी वाढवून दिलेला तीन दिवसांचा अवधी, ट्रम्प यांची न्यायालयीन लढाई यामुळे निकालाबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. जाहीर होणारे हे निकाल प्राथमिकच असले आणि निवडणूक आयोग १० तारखेनंतरच अधिकृत निकाल जाहीर करणार असला तरी या प्राथमिक निकालानंतर चित्र स्पष्ट होते.

US Election 2020: ट्रम्प मारू शकतात बाजी; मोठी आघाडी असूनही बायडेन यांच्यासमोर आव्हान

यंदा मात्र तसे झालेले नाही. जॉर्जिया, पेनसिल्वानिया, उत्तर कॅरोलिना, नेवाडा या राज्यांमध्ये मतमोजणी सुरु असल्याने अधिकाऱ्यांनी प्राथमिक निकालही जाहीर केलेले नाहीत. अद्याप कोणत्याच उमेदवाराने २७० हा जादुई संख्या पार केली नसल्याने दोन्ही बाजूंचे समर्थक आशेवर आहेत. अखेरचे वृत्त हाती आले त्यावेळी जॉर्जियामध्ये ९० हजार मतांची मोजणी बाकी होती तर, पेनसिल्वानियामध्ये ७१ टक्के मते मोजून झाली होती आणि अद्यापही साडे सात लाखांहून अधिक मते मोजण्याची प्रक्रिया सुरु होती. मतमोजणी सुरु असतानाही ट्रम्प यांनी कालप्रमाणे आजही ‘व्हाइट हाऊस’समोर जमलेल्या समर्थकांसमोर विजयाचा दावा केला. 

US Election 2020: पराभव झाला तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिका सोडणार का ?

देशात फार मोठा गैरप्रकार सुरु आहे. माझ्या दृष्टीकोनातून मी आधीच विजयी झालो आहे. 
- डोनाल्ड ट्रम्प, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार

अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून मीच शपथ घेणार आहे. अध्यक्षपद हे राजकारण खेळण्याचे पद नाही. 
- ज्यो बायडेन, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: America Election Politics Donald Trump joe biden