अमेरिकेत तेल टंचाई, ३५ वर्षांमध्ये संरक्षित पेट्रोलियम साठ्यात घट

३५ वर्षांमध्ये संरक्षित पेट्रोलियम साठ्यात घट
Crude Oil Shortage In America
Crude Oil Shortage In Americaesakal

वाॅशिंग्टन : अमेरिकेत आपात्कालीन उपयोगासाठी साठवलेल्या तेलाच्या प्रमाणात ३५ वर्षांमध्ये घसरण झाली आहे. कारण देशात इंधन टंचाई दूर करण्यासाठी जो बायडेन प्रशासनने संरक्षित पेट्रोल साठ्यातून (एसपीआर) तेल पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकन (America) ऊर्जा विभागाच्या आकड्यातून ही माहिती समोर आली आहे. ऊर्जा विभागाने साठवलेल्या तेलाबाबत प्रसिद्ध केलेल्या आकड्यानुसार, एसपीआरमध्ये तेलाच्या प्रमाणात या आठवड्यात १३ मे पर्यंत ५० लाख बॅरलने कमी झाले आहे. आता यात ५३.८ कोटी बॅरलपर्यंत घसरण झाली आहे. (America Face Shortage Of Crude Oil Using Reserves)

Crude Oil Shortage In America
भारताचा लष्करी खर्च जगात तिसऱ्या क्रमांकावर, अमेरिका-चीन आघाडीवर

यातून दिसते की अमेरिकेत आपात्कालीन वापरासाठी तेलाच्या साठ्यात १९८७ नंतर सर्वाधिक घसरण झाली आहे. या आठवड्यात १३ मे पर्यंत साठ्यातून काढण्यात आलेले ५० लाख बॅरलमधून काही ३९ लाख बॅरल दुय्यम दर्जाचे तेल होते. बाकी ११ लाख बॅरल उच्च दर्जाचे तेल (Oil) होते. कमी दर्जाचे तेल मध्यम प्रकारचे तेल असते. त्यात सल्फरचे प्रमाण अधिक असते. तो उच्च दर्जाच्या तेलाच्या तुलनेत जास्त चिकट असतो. साधारणपणे बस, ट्रकसह जेट चालवण्यासाठी कमी दर्जाच्या तेलाची आवश्यकता आहे. दुसरीकडे उच्च दर्जाच्या तेलात सल्फरचे प्रमाण खूपच कमी असते. त्याचा वापर मुख्य रुपात गॅसोलिन बनवण्यासाठी केले जाते. यास अमेरिकेच्या बाहेर पेट्रोल म्हणून ओळखले जाते.

Crude Oil Shortage In America
रशिया-युक्रेन युद्धात पर्यावरणाचाही बळी

युक्रेनमधील (Ukraine) रशियाच्या विशेष लष्करी मोहिमेमुळे माॅस्कोवर बहुतेक पाश्चात्त्य देशांकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे तेलाच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. या व्यतिरिक्त कोरोना विषाणु महामारीत अनेक तेल शुद्धीकरण प्रकल्प बंद राहिल्याने अमेरिकेच्या तेल शुद्धीकरण करण्यात घट झाली आहे. यातून संकट आणखीन गडद झाले आहे. इंधनाच्या टंचाईशी तोंड देण्यासाठी बायडेन प्रशासनाने नोव्हेंबरपासून अनेक टप्प्यात एसपीआरमधून तेल काढणे सुरुच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com