अमेरिकी लोकशाहीचा अनोळखी चेहरा

सर्वसामान्यपणे रिपब्लिकन पक्षाच्या विचारसरणीच्या लोकांचा लस वापरास, मुखपट्टी लावण्यास विरोध असल्याचे दिसून आले.
अमेरिकी लोकशाहीचा अनोळखी चेहरा
अमेरिकी लोकशाहीचा अनोळखी चेहराsakal

अमेरिकेत लशीचा पुरवठा पुरेसा आहे, मात्र ‘आम्ही लस टोचून घेणार नाही, मुखपट्टी बांधणार नाही आणि सरकारने त्याबाबतीत काही नियम अगर कायदे केल्यास आमचा त्यास विरोध असेल,’ अशी भूमिका घेत निदर्शने केली जात आहेत. दुर्दैवाने या प्रश्नातही राजकारण शिरले आहे.

कोरोना विरुद्ध लढाईत सर्व जगच होरपळून निघत आहे. मात्र भिन्न राष्ट्रांत भिन्न परिस्थितीमुळे तेथील समाज या प्रश्नास त्यांच्या दृष्टीने योग्य त्या मार्गाचा अवलंब करून तोंड देत आहे. कोरोनावर परिणामकारक लस उपलब्ध झाली आहे. भारतासारख्या देशात असणाऱ्या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता लसीकरणाच्या कामास काही वेळ लागणे अपेक्षित आहे, तरी डिसेंबर अखेरीस बहुसंख्य लोकांना निदान एक लस दिली जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे आश्वासन दिले गेले आहे. तोपर्यंत इतर पर्यायी सुरक्षेचे मार्ग, जसे मुखपट्टी वापरणे इत्यादीबाबत वारंवार मार्गदर्शक सूचना येत आहेत. मात्र काही ठिकाणी पूर्वग्रहदूषित समाजमानसामुळे हा प्रश्न गंभीर होत आहे. दुर्दैवाने अमेरिकेसारखा अत्यंत प्रगत, संपन्न आणि लोकशाही देशही त्‍याला अपवाद नाही. तेथे या प्रश्नाला वेगळेच परिमाण मिळाले आहे.

अमेरिकेत लशीचा पुरवठा पुरेसा आहे, मात्र ‘आम्ही लस टोचून घेणार नाही, मुखपट्टी बांधणार नाही आणि सरकारने त्याबाबतीत काही नियम अगर कायदे केल्यास आमचा त्यास विरोध असेल,’ अशी भूमिका घेत निदर्शने केली जात आहेत. दुर्दैवाने या प्रश्नातही राजकारण शिरले आहे. अमेरिकेतील ‘गॅलॉप’ या सर्वेक्षण यंत्रणेने केलेल्या पाहणीनुसार २४ टक्के अमेरिकी जनता लसवापराच्या विरोधात आहे. सर्वसामान्यपणे रिपब्लिकन पक्षाच्या विचारसरणीच्या लोकांचा लस वापरास, मुखपट्टी लावण्यास विरोध असल्याचे दिसून आले. टेक्सास प्रांताच्या गव्हर्नरने त्यांच्या प्रांतात मुखपट्टी वापरण्यास बंधन घालण्याचे अध्यादेश काढण्यास नकार दिला, तर फ्लोरिडा प्रांताच्या गव्हर्नरने जो अधिकारी शाळांत अशी मुखपट्टी वापरण्याची सक्ती करेल, त्याचे वेतन थांबविले जाईल, असा धमकीवजा आदेश दिला आहे.

या प्रश्नात डोकावून पाहिल्यास काही निष्कर्ष निघतात व काळजी करण्यासारखी गोष्ट म्हणजे लोकशाहीच्या मुक्त अधिकारामुळे चुकीचे मतदेखील त्याच्या सामाजिक परिणामांचा विचार न करता मांडण्याचा व प्रसार करण्याचा मला अधिकार आहे, अशी विचारसरणी त्यातून प्रसृत केली जाते. योगायोगाची गोष्ट म्हणजे ब्रिटन व युरोपातील संपन्न व शिक्षणाने प्रगत असणाऱ्या ‍या देशातदेखील लसीकरणाचे काय धोके आहेत, हे गैरसमज पसरविणारे साहित्य समाज माध्यमांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे हे बायडेन प्रशासनासमोर आव्हानच आहे. त्याही परिस्थितीत आजपावेतो निदान ६० टक्के नागरिकांना एक वेळ आणि त्यातील ५१ टक्के नागरिकांना दोन वेळा लस दिली आहे. लसीकरणासाठी महत्त्वाचा वयोगट विचारात घेतला तर ७० टक्के लोक त्यात अंतर्भूत झाले आहेत. हा लेख लिहीत असताना एक दु:खद योगायोगाची गोष्ट घडली. फ्लोरिडा राज्यातील एका नभोवाणी वाहिनीचे सूत्रधार डिक फॅरोल जे सातत्याने लसीकरणास विरोध करीत होते, त्यांचा करोनाने बळी घेतला. त्यांच्या शेवटच्या आजारात लोकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे, असे त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक सांगतात.

अमेरिकी लोकशाहीचा अनोळखी चेहरा
T-20 वर्ल्डकपचं वेळापत्रक; भारताचा पहिला सामना पाकविरुद्ध

लशीला विरोधाची कारणे

  • औषध वितरण व्यवसायाशी संबंधित नरेश मगनलाल यांच्या मते अमेरिकेत लसीकरणास पुढील कारणांमुळे विरोध होतो.

  • धार्मिक समजुती व रूढी. अमेरिकेत पश्चिम मध्य भागात धार्मिक विचारांचा पगडा आहे.

  • कुटुंबातील अगर मित्रमंडळींमध्ये लस घेतल्याने काही प्रश्न निर्माण झाल्याच्या घटना ऐकल्यामुळे निर्माण झालेली भीती.

  • लसीकरणामुळे जनुकीय बदल होतात, असे गैरसमज पसरविले जातात, त्याचा परिणाम होतो.

  • ज्यांनी कधीही लस घेतली नाही आणि त्यांना तरीही कधी बाधा झाली नाही, असे लोक लस घेण्यास विरोध करतात.

  • लस घेण्यास सुरुवातीस विरोध करणारे नंतर लस घेण्यास संमती देतात, याचे कारण त्यांना त्यांच्या आप्त मंडळींबरोबर खुलेपणाने रहावयाचे असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com