डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; अमेरिकन मॉडेलचा गौप्यस्फोट

पीटीआय
Friday, 18 September 2020

23 वर्षापूर्वी म्हणजेच 1997 मध्ये अमेरिकी ओपन टेनिस चॅम्पियन्सदरम्यान ट्रम्प यांनी जबरदस्ती केली होती, असा खळबळजनक आरोप तिने केला आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेला धक्का बसला. पूर्वाश्रमीच्या एका मॉडेल आणि अभिनेत्री एमी डॉरिस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. 23 वर्षापूर्वी म्हणजेच 1997 मध्ये अमेरिकी ओपन टेनिस चॅम्पियन्सदरम्यान ट्रम्प यांनी जबरदस्ती केली होती, असा खळबळजनक आरोप तिने केला आहे. अर्थात ट्रम्प यांनी आरोप फेटाळून लावला आहे. येत्या 3 नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणुक होत असून आपली प्रतिमा खराब करण्यासाठीच अशा प्रकारचा आरोप केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

इराणवरील निर्बंधांवरून अमेरिका एकाकी

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एमी डॉरिसने म्हटले की, त्यावेळी आपले मित्र जेसन बिन यांनी ट्रम्प यांची भेट घालून दिली होती. अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेदरम्यान लैंगिक शोषण झाल्याचे तिने म्हटले आहे. ॲथर ॲश स्टेडियममधील व्हीआयपी बॉक्समध्ये ट्रम्प यांनी आपल्याला जबरदस्तीने धरले, असे डॉरिस यांनी आरोप केला. यावेळी आपण ट्रम्प यांना दूर सारण्याचा प्रयत्न केला, परंतु ते दूर झाले नाही. यादरम्यान, ट्रम्प यांच्या वकिलांनी डॉरिस यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रम्प यांची प्रतिमा खराब करण्यासाठी कारस्थान रचले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अध्यक्षांनी कधीही चुकीचे वर्तन केलेले नाही. जर त्यांनी असा प्रकार केला असता तर व्हीआयपी बॉक्समधील अन्य लोकांनी पाहिले असते, असे वकिलाचे म्हणणे आहे दुसरीकडे त्यावेळचे मित्र जेसन बिन यांनी देखील कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america model amy dorris accuses donald trump of sexual assault during tennis match in 1997