esakal | अमेरिकेच्या कोरोना लशीने दिलेय चांगली बातमी, पण भारताला कधी मिळणार?
sakal

बोलून बातमी शोधा

corona_16

अमेरिकेन कंपनी फायझरच्या कोविड-19 लशीच्या (Pfizer Corona vaccine) तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिमाण समोर आले आहेत.

अमेरिकेच्या कोरोना लशीने दिलेय चांगली बातमी, पण भारताला कधी मिळणार?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेन कंपनी फायझरच्या कोविड-19 लशीच्या (Pfizer Corona vaccine) तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिमाण समोर आले आहेत. लस 2020 च्या शेवटापर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. असे असताना ही लस भारतीयांना मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण, फायझरची लस मिळण्यासाठी भारतीयांना वाट पाहावी लागू शकते. लशीचे डोस अमेरिकेत सर्वात आधी उपलब्ध होतील, कारण तेथील सरकारने फायझरसोबत 10 कोटी लशींची अॅडव्हान्स बुकींग केली आहे. याशिवाय कॅनाडा, जपान आणि यूकेनेही अॅडव्हान्समध्ये बुकींग करुन ठेवली आहे. याशिवाय mRNA लशीसाठी -70 डिग्रीपर्यंत तापमान आवश्यक असते, त्यामुळेही भारतात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करुन देण्यासाठी अडचण येऊ शकते. 

फायझरने या लशीसाठी जर्मन कंपनी बायोएनटेक (BionTech) आणि चिनी कंपनी फोसून (Fosun) शी करार केला आहे. जर्मन कंपनी युरोपमध्ये आणि चिनी कंपनी आशियाच्या अनेक भागांमध्ये लशीचे वितरण करेल. भारत या कराराचा भाग नाही. फायझर कंपनीने जागतिक आरोग्य संघटनेचा पाठिंबा असलेल्या covax सोबतही करार केला नाही. भारताने आतापर्यंत कोणत्याही कंपनीसोबत लशीसाठी अॅडव्हान्स अॅग्रीमेंट केलेले नाही. 

Bihar Election : आता भाजप मोठा भाऊ; लोजपाने केसाने कापला गळा?

लशीसंबंधी बनलेल्या राष्ट्रीय ग्रुपच्या समितीने लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि ग्लास वायल उत्पादकांसोबत चर्चा करुन योजना तयार केली आहे. एका अधिकाऱ्यानुसार, भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि कॅडिला पुढील सहा महिन्यात लस स्टोर करण्यासाठी ग्लाय व्हायल्स तयार करण्याची तयारी केली आहे. भारतातील Schottkaisha, Saint Gobain, Borosil Klasspack आणि Gerresheimer India कंपन्या वायल तयार करण्यामध्ये आघाडीवर आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय की, एकदा कोविड-19 लशीला मान्यता मिळाली की,  2021 च्या जूलैपर्यंत 25 ते 30 कोटी भारतीयांना लस देण्याची तयारी आहे. सर्व लशीचे दोन डोस आवश्यक असणार आहेत, त्यामुळे जवळजवळ 50 कोटी डोस लागणार आहेत. दरम्यान, फायझर कंपनीने आपल्या कोविड लशीचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निकाल जाहीर केले आहेत. लस 90 टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात आले आहे.