esakal | भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची टीका; सर्वांत 'धोकादायक सिनेट सदस्य'
sakal

बोलून बातमी शोधा

donald trump and kamla harris.png

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी डेमोक्रॅटचा उप-राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून सिनेटर कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली आहे.

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची टीका; सर्वांत 'धोकादायक सिनेट सदस्य'

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (president donald trump) यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक कमला हॅरिस (Kamala Harris) यांना सिनेटमधील सर्वात भीतीदायक सदस्य म्हटलं आहे. तसेच डेमोक्रेटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन (Joe Biden) यांनी उपराष्ट्रपती (Vice President)  पदासाठी हॅरिस यांना निवडल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना वरील वक्तव्य केलं.

Russia Vaccine Update: रशियाच्या कोरोना लसीवर भारतालाही शंका

कमला हॅरिस यांनी जेव्हा प्राथमिक निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षाचे नामांकन मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता, तेव्हाही मी प्रभावित झाला नव्हतो. कमला हॅरिस यांची कामगिरी प्रभावहिन आणि वाईट राहिलेली आहे, त्यामुळे त्यांच्या निवडीमुळे मी आश्चर्यचकित झालो आहे, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.  सर्वोच्च न्यायालयाच्या ब्रेट कवानाच्या 2018 मधील सिनेट कन्फर्मेशदरम्यान हॅरिस यांची कामगिरी अमेरिकी सिनेटमधील सर्वात निकृष्ट, सर्वात भीतीदायक आणि कोणाचाही सन्मान न करणारी होती, असंही ते म्हणाले होते.

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी डेमोक्रॅटचा उप-राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून सिनेटर कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली आहे. सिनेटमध्ये निवड झालेल्या हॅरिस पहिल्या कृष्णवर्णीय आणि आशियाई सदस्य ठरल्या आहेत. कमला यांची आई चेन्नईच्या आहेत आणि वडील जमैकाचे राहणारे आहेत. कॅलिफोर्नियाच्या सिनेटर असलेल्या कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅटकडून जो बायडेन यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून आव्हान दिलं होतं. मात्र, डेमोक्रॅटिककडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून बायडेन यांनी निवड झाली. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदासाठी कमला हॅरिस यांना संधी देण्यात येईल असं सांगितलं जातं होतं.

सलग आठव्या दिवशी देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अमेरिका, ब्राझीलपेक्षाही अधिक

जो बायडेन यांनी ट्विट करत कमला हॅरिस यांच्या निवडीची घोषणा केली आहे. मला जाहीर करताना गर्व वाटतोय की माझ्या साथीदार कमला हॅरिस यांच्या सारख्या शूर युद्ध्या आणि देशाच्या सर्वोत्तम अधिकारी म्हणून मी त्यांची निवड केली आहे, असं ते म्हणाले आहेत. यावर कमला हॅरिस यांनी बायडेन यांचे आभार मानले आहेत. जो बायडेन यांनी लोकांसाठी आपले जीवन खर्ची घातले आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून ते आदर्श अमेरिका घडवतील. बायडेन लोकांमधील एकता कायम ठेवू शकतात. त्यांची निवड सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्ण प्रयन्त करेन, असं कमला म्हणाल्या आहेत. दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. यावेळी निवडणुकीत कोण बाजी मारेल याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.