अमेरिकेच्या निवडणुकीत रंगत; ट्रम्प यांना टक्कर देतायत जो बायडेन

joe biden and donald trump
joe biden and donald trump

वॉशिंग्टन - कोरोना विषाणू महामारीने प्रभावित झालेल्या अमेरिकेमध्ये याच वर्षी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार जो बाइडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती पदासाठी इंडियाना येथे झालेल्या प्राथमिक निवडणुकीत विजय मिळवला आहे. इंडियाना येथील निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार कोण असतील हे आधीच स्पष्ट झालं होतं. कारण येथे बाइडेन यांच्या विरोधकांनी निवडणुकीआधी माघार घेतली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

इंडियाना येथे मिळालेल्या विजयामुळे माजी उपराष्ट्रपती जो बायडेन यांना डेमोक्रेटिक पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठी मिळणारे नामाकंन जवळजवळ निश्चित मानलं जात आहे. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरण्यासाठी 1,991 प्रतिनिधींचा पाठिंबा असणे आवश्यक असते. बायडेन या आकड्याच्या अगदी जवळ जाऊन पोहोचले आहेत. तर डॉनाल्ड ट्रम्प यांना याआधीच रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाली आहे.

बायडेन यांनी आतापर्यंत सात राज्यातील प्राथमिक निवडणुका जिंकल्या आहेत. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत त्यांना सर्वात अधिक प्रतिनिधी पेन्सिलवेनिया राज्यातून मिळाले आहेत. तसेच मैरीलँड, इंडियाना, रहोडे आइलँड, न्यू मॅक्सिको, मोटाना आणि दक्षिण डकोटा या राज्यात बायडेन यांनी विजय मिळवला आहे. कोरोना विषाणू या वैश्विक महामारीमुळे इंडियाना येथील प्राथमिक निवडणुका एक महिना उशीराने झाल्या. इडाहो, इंडियाना, आयोवा, मॅरीलँड, मोंटाना, न्यू मॅक्सिको, पेन्सिलवेनिया, रहोडे आइलँड आणि दक्षिण डकोटा या राज्यांमध्ये आतापर्यंत प्राथमिक निवडणुका झाल्या आहेत.

दरम्यान, 2016 साली झालेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यकारकरित्या विजय झाला होता. त्यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांना 2020 सालची निवडणूक अवघड जाणार आहे. कारण कोरोना महामारीमुळे अमेरिकेमध्ये एक लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे. शिवाय कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लाइड यांच्या मृत्यूमुळे अमेरिकेतील वातावरण तापलं आहे. देशात आंदोलनाचा भडका उडाला आहे. अशावेळी डॉनाल्ड ट्रम्प यांची दांडगाईची भूमिका अनेक अमेरिकन नागरिकांना रुचलेली नाही. त्यामुळे जनमत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जात असल्याचं सध्याचं चित्र आहे. मात्र, निवडणुकीला अजून अवकाश असल्याने येत्या काळात काय घडामोडी घडतात हे पाहावं लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com