
कोरोना विषाणूमुळे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतीय विधानसभेचे सदस्य आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ या पक्षाचे नेते मियां जमशेद काकाखेल(65) 10 दिवसांपूर्वी कोरोना संक्रमित आढळून आले होते. त्यांच्यावर इस्लामाबादमधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मियां जमशेद गेल्या तीन दिवसांपासून वेंटिलेटरवर होते. बुधवारी सकाळी त्यांच्या मृत्यू झाला आहे.
इस्लामाबाद - कोरोना विषाणूमुळे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतीय विधानसभेचे सदस्य आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ या पक्षाचे नेते मियां जमशेद काकाखेल(65) 10 दिवसांपूर्वी कोरोना संक्रमित आढळून आले होते. त्यांच्यावर इस्लामाबादमधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मियां जमशेद गेल्या तीन दिवसांपासून वेंटिलेटरवर होते. बुधवारी सकाळी त्यांच्या मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मियां जमशेद यांच्या मुलालाही कोरोना विषाणूची लागण झाली होती. मात्र, ते बरे झाले आहेत. त्यांच्या परिवारातील इतर जणांना कोरोनाची लागण झालेली नाही.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मियां जमशेद 2018 मध्ये खैबर पख्तूनख्वामधील पीके-63 नौशेरा भागातून निवडून आले होते. याआधी, मंगळवारी सिंध प्रातांतील मानव संसाधन मंत्री गुलाम मुर्तजा बलोच यांचा covid-19 मुळे मृत्यू झाला होता. पाकिस्तानमधील अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील काहींचा मृत्यूही झाला आहे. यापूर्वी पाकिस्तानी नेते मुनीर खान ओराकजई यांची कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मागील आठवड्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे पाकिस्तानातील स्थिती गंभीर बनताना दिसत आहे.
अमेरिकेत महात्मा गांधीच्या पुतळ्याची विटंबना
खैबर पख्तूनख्या विधानसभेतील आठ सदस्य संक्रमित आढळले आहे. नॅशनल असेम्बलीचे अध्यक्ष असद कैसर यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता ते बरे झाले आहेत. पाकिस्तानमध्ये मंगळवारी आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळळे आहेत. मंगळवारी 4,132 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एकूण आकडा 80,463 पर्यंत पोहोचला आहे. एका दिवसांत आतापर्यंत सर्वाधिक 17,370 लोकांची covid-19 चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे हा आकडा वाढल्याचं पाकिस्तानी आरोग्य आणि स्वास्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
हिटलरच्या जन्मस्थळी होणार पोलिस ठाणे, तीन मजली इमारतीची पुनर्रचना
कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी कोणतीही लस विकसित झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना covid-19 सोबत जगायला शिकायला हवं, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले आहेत. पाकिस्तानमध्ये कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी राष्ट्रीय समन्वय समिती स्थापित करण्यात आली आहे. कोरोनावर अजून उपचार उपलब्ध नाही. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी कोरोना विषाणूसोबत जगायला हवं. तसेच वैयक्तिक पातळीवर लोकांनी काळजी घ्यायला हवी, असंही खान म्हणाले आहेत.