ऑसच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली खिचडी खाण्याची इच्छा; PM मोदी म्हणाले...

टीम ई-सकाळ
Thursday, 4 June 2020

स्कॉट मॉरिसन यांनी यावेळी मोदींचे कौतुक केले. मोदींचे नेतृत्व प्रतिभावंत असून त्यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाजन्य परिस्थितीत भारताने इतर राष्ट्रांना केलील मदत कौतुकास्पद आहे, असे स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत व्हर्च्युअल समिटमध्ये सहभाग घेतला. ऑस्ट्रेलियाशी असेलेले संबंध अधिक व्यापक आणि जलद गतीने अधिक दृढ करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. हे फक्त आमच्यासाठीच नाही तर इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी तसेच जगासाठीही आवश्यक आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध आणखी सशक्त करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, असेही मोदींनी म्हटले आहे.  

पाकिस्तानची स्थिती गंभीर! आणखी एका आमदाराचा कोविड 19 मुळे मृत्यू

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा उल्लेख करत मोदींनी ऑस्ट्रेलियाच्या दुख:त सहभागी असल्याचे म्हटले. दुसरीकडे स्कॉट मॉरिसन यांनी यावेळी मोदींचे कौतुक केले. मोदींचे नेतृत्व प्रतिभावंत असून त्यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाजन्य परिस्थितीत भारताने इतर राष्ट्रांना केलील मदत कौतुकास्पद आहे, असे स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे. मोदींसोबतच्या चर्चेत त्यांनी भारतीय खिचडी खाण्याची इच्छा देखील व्यक्त केली. कोरोनाजन्य परिस्थिती आवाक्यात आल्यानंतर सह कुटुंब भारत दौऱ्यावर यावे, असे निमंत्रण पंतप्रधान मोदींनी त्यांना दिले. त्यामुळे कोरोनाजन्य परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर मोदी-मॉरिसन खिचडी प्रोग्राम झाला तर नवल वाटणार नाही. 

अमेरिकेत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना

यापूर्वी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी समोसा आणि चटणीचा एक फोटो शेअर केला होता. मोदींसोबत समोसे खाण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना लवकरच ती वेळ येईल, अशा आशयाचा रिप्लाय दिला होता. समोसा आणि खिचडी या पदार्थाच्या चर्चच्या माध्यमातून दोन्ही देशाचे नेते एकमेकांसोबतचे संबंध उत्तम असल्याचे दाखवून देत आहेत.     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi invites Australian PM Scott Morrison in virtual summit