esakal | अमेरिकेला गंभीर स्थितीचा सामना करावा लागेल, उत्तर कोरियाचा इशारा

बोलून बातमी शोधा

Joe Biden
अमेरिकेला गंभीर स्थितीचा सामना करावा लागेल, उत्तर कोरियाचा इशारा
sakal_logo
By
नामदेव कुंभार

अमेरिकेला गंभीर स्थितीचा सामना करावा लागेल, असा इशारा रविवारी उत्तर कोरियानं दिला आहे. उत्तर कोरियानं रविवारी दिलेल्या जबाबत म्हटलेय की, "अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी नुकत्याच केलेल्या भाषणात उत्तर कोरिया सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक असल्यां म्हणत शत्रुतापूर्ण नीतीचा हेतू व्यक्त करत मोठी चूक केली आहे. अमेरिकेला या सर्वांची मोठी किंमत मोजावी लागू शकते. भविष्यत अमेरिकेला खूप गंभीर स्थितीचा सामना करावा लागेल."

बायडन यांनी गेल्या आठवड्यात संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात उत्तर कोरिया आणि इराणच्या परमाणू कार्यक्रम अमेरिका आणि जगासाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक असल्याचं म्हटलं होतं. तसेच कूटनिती आणि मित्र देशांच्या मदतीनं या समस्याचा सामना करण्यास अमेरिका तयार असल्याचे बायडन स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा: VIDEO: आधी अडखळले मग पुन्हा पडले, विमानाच्या पायऱ्या चढताना बायडन यांचा 3 वेळा घसरला पाय

उत्तर कोरियाचे विदेश मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी क्वोन जोंग गुन यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलेय की, ‘‘त्यांचं (बायडन) हे वक्तव्य उत्तर कोरियाबाबतची शत्रुतापूर्ण नीती दाखवते. नेहमीप्रमाणे प्रत्येक अमेरिकन करत आलेत. ’’ अमेरिकेच्या आधिकाऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीत ही मोठी चूक केल्याचं नक्की, असेही क्वोन म्हणाले.

हेही वाचा: ४० बड्या अमेरिकन कंपन्यांचा भारतासाठी मदतीचा हात; बायडन म्हणाले...

अमेरिकेची उत्तर कोरियाबाबतची निती पुन्हा एकदा दिसून आली आहे. त्यानुसारच आम्ही पावले उचणार असून वेळ आल्यावर अमेरिकेला याची किंमत मोजावी लागेल, असं क्वोन म्हणाले. भविष्यत उत्तर कोरिया नेमकं कोणतं पाऊल उचणार याबाबत काहीही क्वोन स्पष्ट केलं नाही. मात्र क्वोन यांचं वक्तव्य अमेरिकेवर दबाव निर्माण करण्यासाठी असल्याचं बोललं जातं.