
अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाचा मोठा अपघात टळला आहे . विमानाचे उड्डणा होतानाच लँडिंग गियरला आग लागली त्यामुळे विमानातील सर्व १७३ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. शनिवारी डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना हा अपघात घडला. डेन्व्हर अग्निशमन विभागाने सांगितले की, बोईंग ७३७ मॅक्स विमान रनवे ३४Lवरून डेन्व्हरहून मियामीसाठी उड्डाण करत असताना ही घटना घडली.