esakal | अमेरिकी भारतीयांची ट्रम्प यांना पसंती; मोदी यांच्या मैत्रीसह अनेक मुद्यांवरून समर्थन
sakal

बोलून बातमी शोधा

modi and trump.jpg

अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार असलेले विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्या विजयाबद्दल अनेक आडाखे बांधले जात आहे.

अमेरिकी भारतीयांची ट्रम्प यांना पसंती; मोदी यांच्या मैत्रीसह अनेक मुद्यांवरून समर्थन

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार असलेले विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्या विजयाबद्दल अनेक आडाखे बांधले जात आहे. एका अंतर्गत पाहणीत अमेरिकेतील भारतीय वंशाचे मतदार ट्रम्प यांना मोठ्या प्रमाणावर समर्थन देत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. या मागे प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरील मैत्रीसह अनेक कारणे असल्याचे यात म्हटले आहे.

निवडणूक हरल्यास ट्रम्प यांचा सहजासहजी पायउतार होण्यास नकार!

‘ट्रम्‍प व्हिक्टरी इंडियन अमेरिकन फायनान्स कमिटी’ या संस्थेचे सह अध्यक्ष अल मॅन्सन यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही पाहणी केली. अमेरिकेतील भारतीयांबद्दल आदर, भारत व पंतप्रधान मोदी यांना समान महत्त्व दिल्याने ट्रम्प यांची लोकप्रियता वाढली आहे. पूर्वीचे अध्यक्ष आणि अध्यक्षपदाचे सध्याचे स्पर्धक उमेदवार हे काश्मीरसारख्या भारताच्या अंतर्गत मुद्यांपासून दूर राहिले असले तरी ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली असल्याचे मत तेथील भारतीयांचे आहे, असे या पाहणी अहवालात नमूद केले आहे.

‘चीनपासून भारताचे संरक्षण व्हावे’

अमेरिकेत राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या कुटुंबातील सदस्य उदा. वयोवृद्ध आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र भारतात राहतो. त्यामुळे चीनपासून भारत सुरक्षित राहावा आणि भारताचा आदर केला जावा, असे त्यांना वाटत असते. हे ट्रम्प यांच्यामुळे शक्य होईल, अशी भावना त्यांच्‍यामध्ये आहे. जर ट्रम्प नसतील तर चीन भारताविरोधात युद्ध पुकारेल, अशी भीती तेथील भारतीयांना वाटत असल्याचा मुद्दा पाहणीत प्रकर्षाने नोंदविला असून ट्रम्प यांच्या प्रचाराची दिशा त्यादिशेने जाणारी आहे.

अमेरिकी भारतीयांना वाटते...
- ट्रम्‍प व मोदी यांच्यातील मैत्री
- दोन्ही नेत्यांच्या पुढील चार वर्षांतील एकत्रित प्रयत्नांमुळे चीनला नामोहरम करणे शक्य
- चीनविरोधी भूमिकेमुळे देशाला युद्धात ढकलण्याऐवजी शांतता प्रस्थापित करणारा नेता अशी ट्रम्प यांची प्रतिमा
- कोरोना काळातील स्थिती हाताळण्यात आणि कोरोनापूर्व काळातील अमेरिकेचे आर्थिक पुनरुज्जीवन
- ट्रम्प यांच्यामुळे जगात भारताची मान उंचावली
- ट्रम्प व मोदी यांच्यामुळे भारत- अमेरिका संबंध बळकट झाले

दिल्ली दंगलीत अडकला काँग्रेसचा बडा नेता; चार्जशीटमध्ये नाव

वाऱ्याची बदलती दिशा
- अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे ५० टक्के परंपरागत भारतीय
अमेरिकी मतदार ट्रम्प यांच्याकडे झुकणार
- या बदलामुळे ट्रम्प यांच्या मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल


भारताच्या कायापालटासाठी विशेषतः काश्‍मीर प्रश्‍न सोडविणे, ३७० वे कलम रद्द करणे आणि नागरिकत्व कायदा यांसारखे जे धाडसी निर्णय मोदी यांनी घेतले आहेत, त्याला ट्रम्प यांचा पाठिंबा दिल्याने मला आनंद आहे. ट्रम्प आणि मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांमध्‍ये २०२१ मध्ये अजून सकारात्मक गोष्टी घडतील, असा मला विश्‍वास आहे, असं न्यूजर्सीतील चिकित्सक सल्लागार व उद्योजक डॉ. आनंद ताम्हणकर म्हणाल्या आहेत.