अमेरिकेचे "ब्लॅकमेलिंग' अस्वीकार्य

वृत्तसंस्था
रविवार, 5 ऑगस्ट 2018

बीजिंग : अमेरिकेकडून आयात होणाऱ्या सुमारे 60 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या सरकारच्या निर्णयाची आज चीनमधील माध्यमांनी पाठराखण केली. हा निर्णय तर्कसंगत व योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

अमेरिकेने नुकतीच चीनकडून आयात होणाऱ्या 60 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर जादा शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. त्याला चीननेही त्याच भाषेत उत्तर दिले. शुक्रवारी चीनच्या अर्थमंत्र्यांनी अमेरिकेकडून आयात होणाऱ्या 5,207 उत्पादनांची यादी जाहीर केली. या उत्पादनांवर 5 ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत जादा शुल्क आकारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्लोबल टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात चीनचा हा निर्णय तर्कसंगत व योग्य असल्याचे नमूद आहे. 

शुल्कवाढीच्या आडून अमेरिकेचे सुरू असणार ब्लॅकमेलिंग अस्वीकार्य असून, चीनकडून आगामी काळात अमेरिकेच्या सुमारे 110 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर जादा शुल्क आकारले जाऊ शकते, असेही माध्यमांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या सुमारे 130 अब्ज डॉलरच्या उत्पादनांची आयात चीनकडून केली जाते. 

Web Title: Americas Blackmail is unacceptable

टॅग्स