पाण्यात सापडला मेंदू खाणारा अमिबा; अमेरिकेच्या टेक्सासमधील पाणी पुरवठा बंद

amiba and brain.jpg
amiba and brain.jpg

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील दक्षिणपूर्व भागात पाण्याच्या पुरवठा साखळीमध्ये अमिबा  (brain-eating amoeba)  सापडला आहे. त्यामुळे आठ शहरांच्या नागरिकांना अलर्ट करण्यात आले आहे. हा अमिबा मेंदू खाणारा असल्याचं सांगण्यात आलं आहे. सर्वांनी काळजी घ्यावी अन्यथा यामुळे मोठे नुकसान होऊ शकते, अशी चेतावणी टेक्सास प्रशासनाने दिली आहे. टेक्सास कमीशनने पर्यावरण गुणवत्तेच्या आधारे वॉटर अॅडवायझरी जारी केली आहे. पाण्यामध्ये नाइगेलेरिया फाऊलेरी म्हणजेच मेंदू खाणारा अमिबा आहे, त्यामुळे पाण्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.  

अॅडवायझरीमध्ये म्हणण्यात आलंय की, टेक्सास कमीशन पर्यावरण गुणवत्तेला लक्षात घेऊन ब्राजोस्पोर्ट वॉटर अथॉरिटीसोबत पाण्याची सध्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे.  सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रीवेंशननुसार, मेंदू खाणारा हा अमीबा साधारणपणे माती, गर्म पाण्याचे डबके, नदी आणि गरम झऱ्याच्या पाण्यामध्ये आढळतात. स्वच्छतेची कमतरता असलेल्या स्वीमिंग पूलमध्येही हा अमिबा आढळतो. शिवाय औद्यागिक कारखाण्यांमधून निघणाऱ्या गरम पाण्यामध्येही अमिबा सापडतो.

लोकांना पाणी न वापरण्याच्या सूचना

लेक जॅकसन, फ्रीपोर्य ऐंगलटन, ब्राजोरिया, रिचवुड,  आयस्टर क्रीक, क्लूट आणि रोजनबर्ग भागात पाणी न वापरण्यास सांगण्यात आलं आहे. अमिबायुक्त पाण्याच्या वापरामुळे मोठा अनर्थ ओढवू शकतो, अशा सूचना लेक जॅकसन भागात जारी करण्यात आल्या आहेत. शिवाय या भागातील पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी अॅडवायझरी जाहीर करण्यात आल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com