Tutankhamun Sandals, Ancient Egypt Discovery
esakal
Tutankhamun Sandals, Ancient Egypt Discovery : इजिप्तच्या इतिहासातील सर्वात गूढ आणि चर्चेत असलेला 'फारो' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुतानखामुनच्या थडग्यातून सापडलेल्या एका अनोख्या वस्तूने पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल ३,३०० वर्षे जुने हे सँडल केवळ ऐतिहासिक नसून, फारोच्या राजकीय सामर्थ्याचे प्रभावी प्रतीक असल्याचे संशोधकांचे मत आहे.