CEO-HR Romance in Coldplay ConcertEsakal
ग्लोबल
CEO अन् HR हेडचं अफेअर, VIRAL Videoमध्ये दिसणारी दुसरी महिला कोण? नुकतंच मिळालंय प्रमोशन
CEO-HR Romance in Coldplay Concert : अॅस्ट्रॉनॉमर कंपनीचे सीईओ अँडी बायरन आणि त्यांच्या एचआर विभागाची प्रमुख क्रिस्टिन कॅबोट या दोघांना किस कॅमने मिठी मारलेल्या अवस्थेत कैद केलं.
अमेरिकेत फॉक्सबोरो इथल्या जिलेट स्टेडियममध्ये नुकतीच कोल्ड प्ले कॉन्सर्ट पार पडली. या कॉन्सर्टमधला व्हायरल होणारा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. कॉन्सर्टवेळी गायक क्रिस मार्टिनने एका कपलकडे इशारा करताच कॅमेरा त्यांच्याकडे फिरवला. त्यानंतर कॉन्सर्टमध्ये असणाऱ्या स्क्रीनवर एक कपल एकमेकांच्या मिठीत असल्याचं दिसलं. पण जेव्हा त्या दोघांना ही बाब समजली तेव्हा दोघेही चेहरा लपवण्याचा प्रयत्न करू लागले. अॅस्ट्रोनमर कंपनीचा सीईओ आणि त्याच कंपनीची एचआर हेड यांचा हा व्हिडीओ आहे.