इम्रानविरोधी मोहिमेला येतोय वेग

पीटीआय
Wednesday, 7 October 2020

पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात सुरू केलेल्या मोहीम वेग येत असून, 16 ऑक्टोबर रोजी पहिली सभा गुजरानवाला येथे घेण्याचे ठरले आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात सुरू केलेल्या मोहीम वेग येत असून, 16 ऑक्टोबर रोजी पहिली सभा गुजरानवाला येथे घेण्याचे ठरले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मूळ कार्यक्रमानुसार क्वेट्टा येथे ही सभा होणार होती, मात्र सुकाणू समितीने सोमवारी जाहीर केलेल्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. आघाडीचे निमंत्रक तसेच पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाझ पक्षाचे नेते एहसान इक्बाल यांनी सांगितले की, पाकिस्तान पीपल्स पार्टीतर्फे 18 ऑक्टोबर या दिवशी कराची बाँबस्फोटातील मृतांना आदरांजली अर्पण केली जाते. 2007 मध्ये करसाज परिसरातील बेनझीर भुट्टो यांच्या सभेच्यावेळी स्फोट झाला होता. त्यात 180 नागरिक मारले गेले होते.वीस सप्टेंबर रोजी अकरा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी इस्लामाबादमध्ये एकत्र येत पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटची (पीडीएम) स्थापना केली. त्यांच्या कृती योजनेनुसार तीन टप्प्यांत सरकारविरोधी मोहीम राबविली जाईल. 

कोविड-19 लस लवकरच मिळणार; WHOने दिली चांगली बातमी

सहा सभा होणार

  • गुजरानवाल येथील सभेने प्रारंभ
  • ऑक्टोबरमध्ये कराची (तारीख 18),  क्वेट्टा (25) येथे सभा
  • नोव्हेंबरमध्ये पेशावर (22) व मुलतान (30) येथे सभा
  • 13 डिसेंबर रोजी लाहोरला सभेचे आयोजन

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anti Imran khan campaign is gaining momentum