esakal | ब्रिटनमध्ये होणार प्रतिजैविकांच्या चाचण्या
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccine

लंडनमधील जवळपास १७ टक्के आणि ब्रिटनमधील ५ टक्के नागरिकांच्या शरीरात कोरोनाविरोधातील प्रतिजैविके असल्याचा अंदाज ब्रिटन सरकारने घेतलेल्या सर्वेक्षणानंतर व्यक्त करण्यात आला आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी ही माहिती दिली. हॅनकॉक म्हणाले की, पुढील आठवड्यापासून ब्रिटनमध्ये एक कोटी प्रतिजैविक चाचण्या घेतल्या जाणार आहेत. याची सुरवात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपासून होणार आहे.

ब्रिटनमध्ये होणार प्रतिजैविकांच्या चाचण्या

sakal_logo
By
पीटीआय

लंडन - लंडनमधील जवळपास १७ टक्के आणि ब्रिटनमधील ५ टक्के नागरिकांच्या शरीरात कोरोनाविरोधातील प्रतिजैविके असल्याचा अंदाज ब्रिटन सरकारने घेतलेल्या सर्वेक्षणानंतर व्यक्त करण्यात आला आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी ही माहिती दिली. हॅनकॉक म्हणाले की, पुढील आठवड्यापासून ब्रिटनमध्ये एक कोटी प्रतिजैविक चाचण्या घेतल्या जाणार आहेत. याची सुरवात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपासून होणार आहे. याबाबत केलेल्या सर्वेक्षणानंतर अंदाज बांधण्यात आला आहे. कोरोनाची वेगवान चाचणी विकसीत करण्याचाही ब्रिटन सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नागरिकत्व योजनेचा विस्तार
ब्रिटनमधील वैद्यकीय क्षेत्रात काम करत असलेल्या विदेशी नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना देशाचे नागरिकत्व देण्याच्या योजनेचा सरकारने विस्तार केला असून आरोग्य क्षेत्रात आणि सामाजिक सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच विदेशी नागरिकांना ती लागू करण्यात आली आहे.

जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी ही माहिती दिली. ‘कोरोनाविरोधात आघाडीवर राहून लढणाऱ्या विदेशी डॉक्टर आणि परिचारिकांबरोबरच अल्पवेतन असलेल्या या क्षेत्रातील सर्वांनाच ही योजना लागू असेल. याचा येथील भारतीयांनाही फायदा होणार आहे. या संकटाच्या परिस्थितीत या लोकांनी मोठा त्याग करत सेवा दिली आहे,’ असे पटेल म्हणाल्या.

loading image