सर्वांनी एकतेची भावना जपत विद्वेषाच्या भावनेला दूर लोटावे - अँटोनिओ गुटेरेस

पीटीआय
रविवार, 24 मे 2020

सर्व जग एका मोठ्या संकटाचा सामना करत असताना एकात्म भावनेची नितांत आवश्यकता आहे. रमजानच्या शिकवणुकीमधून आपण दया आणि प्रेम, आत्मसन्मान आणि अधिकार, परस्पर आदर आणि सामंजस्य, एकता आणि एकनिष्ठता ही मूल्ये आत्मसात करूया.
- अँटोनिओ गुटेरेस, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस

न्यूयॉर्क - मुस्लिमांबद्दलचा पूर्वग्रह, असहिष्णुता आणि द्वेषभावना यांना स्पष्टपणे नाकारण्यास कटिबद्ध असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी आज सांगितले. सध्या रमजानचा महिना सुरू असल्याने त्याचे महत्व जाणून सर्वांनीच एकमेकांबद्दल प्रेम, परस्पर आदर आणि एकतेची भावना राखणे शिकायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

गुटेरेस यांनी आज इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (ओआयसी) सदस्य देशांशी संवाद साधला. सर्वांनी एकतेची भावना जपत विद्वेषाच्या भावनेला दूर लोटावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ''सध्याच्या काळात एकनिष्ठता आणि एकता यांची पूर्वी कधी नव्हती इतकी गरज भासत आहे. काही विशिष्ट समुदायांना लक्ष्य केले जात असताना त्याला विरोध करत आपण एकता जपायला हवी.

या देशाला सतावतेय कोरोना विषाणूचं नवं केंद्रस्थान बनण्याची भीती

जगभरात मुस्लिमविरोधी भावनेला थारा न देण्यासाठी संयुक्त राष्ट्र कटिबद्ध आहे,'' असे गुटेरेस म्हणाले. कोरोना संसर्गाच्या छायेत यंदा जगभरात रमजान ईद साजरी होणार आहे. कोरोनामुळे जगाच्या मर्यादा उघड पडल्या असून एकमेकांवरील अवलंबित्व सिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: antonio guterres talking