esakal | अर्मेनिया - अझरबैजानचे युद्ध रोखण्यासाठी रशियाचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

putin azerbaijan armenia russia

गेल्या दोन आठवड्यांपासून या प्रांतात चकमकी झडत असल्यामुळे शेकडो लोकांचा जीव गेला आहे. अर्मेनियाच्या फुटीर बंडखोरांनी अझरबैजानला आव्हान दिले असून हा संघर्ष थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.

अर्मेनिया - अझरबैजानचे युद्ध रोखण्यासाठी रशियाचा पुढाकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शुशा (अझरबैजान) - नागोर्नो-काराबाख प्रांतात संघर्ष करीत असलेल्या अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात शांततेसाठी चर्चा घडवून आणण्यासाठी रशियाने पुढाकार घेतला आहे. या दोन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना मॉस्को भेटीचे आमंत्रण त्यांनी दिले आहे.

मानवतावादी कारणांसाठी संघर्ष थांबवावा असेही पुतीन यांनी म्हटले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून या प्रांतात चकमकी झडत असल्यामुळे शेकडो लोकांचा जीव गेला आहे. अर्मेनियाच्या फुटीर बंडखोरांनी अझरबैजानला आव्हान दिले असून हा संघर्ष थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.

मानवतावादी भावनेतून मृतदेह तसेच कैदी एकमेकांकडे सोपविणे शक्य होऊ शकेल असेही रशियाने म्हटले आहे. अर्मेनियाने मात्र जोपर्यंत संघर्ष सुरू आहे तोपर्यंत प्रमुख राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये कोणतीही चर्चा होणार नाही असे स्पष्ट केले आहे.

हे वाचा - Nobel Peace Prize: संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न मोहिमेला नोबेल शांतता पुरस्कार

याआधी जिनीव्हामद्ये चर्चा झाली होती, पण तेव्हा अपेक्षा फारच कमी होत्या. बंद खोलीतील चर्चेत अर्मेनियाचा सहभाग नव्हता. त्यामुळे कोणतेही निवेदन जारी करण्यात आले नव्हते.

प्रांताच्या चर्चवर हल्ला
नागोर्नो-काराबाख प्रांतातील ऐतिहासिक चर्चवर अझरबैजानच्या सैनिकांनी गोळीबार केल्याचा आरोप अर्मेनियाने केला. त्याआधी बाँबहल्ल्यात अनेक पत्रकार जखमी झाले. त्यात चर्चमधील लाकडी बाक तसेच चुनखडीच्या भिंतीवरील नक्षीकामाचे नुकसान झाले.